संगीत चरित्र कथेची पत्रिका पैस खांबास अर्पण 3 ते 10 मेपर्यंत डॉ. शिरसाठ महाराज करणार विवेचन

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात भास्करगिरी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख व आळंदी येथील डॉ. रवीदास महाराज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 10 मे या कालावधीत होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताह व सायंकाळी 5 ते 8 यावेळेत होणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संगीत चरित्र कथेच्या होणार्‍या कार्यक्रमाची पहिली पत्रिका पैस खांबास अर्पण करण्यात आली.

यावेळी चरित्र कथाकार डॉ. रवीदास महाराज शिरसाठ, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, सोहळा नियोजन समितीचे अध्यक्ष संतोष काळे, सोहळा समितीचे सदस्य रामभाऊ जगताप, नगरसेवक सुनील वाघ, पत्रकार सुधीर चव्हाण, भिवाजी आघाव, रावसाहेब काळे, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष बापूराव बहिरट, राजेंद्र टेमक, सुभाष मते, नानासाहेब डौले, दीपक आगळे, भानुदास रेडे, बाळासाहेब जायगुडे, सुभाष नांदे, बापूसाहेब दारकुंडे, संजय वाकचौरे, शिवले पाटील, अभिषेक पटारे उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्रभाव ज्ञानयज्ञ (कथा) व ज्ञानेश्वर पारायण महोत्सवाच्या पत्रिकेच्या लोकार्पण प्रसंगी देणगी पुस्तिकेचा प्रारंभही करण्यात झाला. याप्रसंगी सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या सोहळयाच्या नियोजनासाठी गावोगावी पत्रिका वाटप, निधी संकलन, इतर सोयी-सुविधा उपलब्ध करणे याविषयी माहिती दिली. सदरच्या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाख इतका खर्च होणार असल्याने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने योगदान देऊन सोहळा वैभवशाली पद्धतीने यशस्वी होण्यासाठी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केले.

Visits: 226 Today: 1 Total: 2123165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *