कृषी सेवा पुरविण्यासाठी देहात-हेलिक्रॉफ्टरमध्ये भागीदारी सुलभ अॅपवरून ऑर्डर केल्यानंतर तत्काळ होणार पुरवठा

नायक वृत्तसेवा, नगर
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतकर्यांमध्ये देखील आमूलाग्र बदल घडून येत आहेत. पश्चिम भारतातील शेतकर्यांना कृषी क्षेत्रासंबंधी विविध प्रकारच्या सेवा देणारी संस्था देहातने महाराष्ट्रात कार्य करणार्या बी 2 बी ग्री इनपुट मार्केट प्लेस स्टार्टअप हेलिक्रॉफ्टर सोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून शेतकर्यांना शेतमालाची अवजारे, बियाणे, खते, शेतीविषयक संपूर्ण सेवा पुरविण्यात येणार आहेत.

देहात हे प्रामुख्याने ‘देहात सेंटर’ या नावाने ओळखले जाते. आजवर देहातने 6000 हून अधिक सूक्ष्म उद्योजकांच्या माध्यमातून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमधील सुमारे 8 लाख शेतकर्यांना सेवा पुरवत आहे आणि आता विस्तार करत महाराष्ट्रातील शेतकर्यांस सेवा देण्यास सज्ज झाले आहे. बियाणे, खते, कीटकनाशक, कृषी अवजारे, पशुखाद्य व सर्व कृषी संलग्न उत्पादनांची विक्री करणारे स्थानिक कृषी केंद्र आणि शेतमाल व्यावसायिक यांच्यासोबत भागीदारी करून देहात शेतकर्यांना दर्जेदार उत्पादनं आणि सेवा प्रदान करणार आहे. देहातशी जोडल्या गेलेल्या ग्री इनपुट कंपन्यांद्वारे देहात सेंटर्सना सर्व प्रकारची कृषी उत्पादने, देहात बिझनेस अॅप या अत्यंत सोप्या व सुलभ अॅपवरून दुकानात बसल्या बसल्या ऑर्डर करता येऊ शकणार आहे. कंपनीने मोक्याच्या ठिकाणी उभारलेली गोदामे, कार्यक्षम पुरवठा साखळी व ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी असलेली भागीदारीमुळे ऑर्डरची डिलिव्हरी जलद गतीने केली जाते.

या अॅपद्वारे शेतकर्यांना देहात सेंटर्समधील उत्पादने आणि सेवांबाबतची माहिती आसपासच्या गावातील शेतकर्यांपर्यंत पोहोचवता येते. कंपनीची फिल्डवर काम करणारी मजबूत सेल्स टीम देहात सेंटरला त्यांच्या खरेदीचे नियोजन करण्यासाठी मदत करते, तर गावांमध्ये काम करणारी कृषी विस्तार टीम शेतकर्यांना त्यांच्या शेतीविषयक समस्यांनुसार उपाय पुरवते आणि फार्मर मीटिंग, डेमोद्वारे शेतकर्यांमध्ये उत्पादनांबाबत जागरूकता निर्माण करते. त्याचबरोबर ऑनलाईन जाहिराती, अॅप व फोनमार्फत पीकविषयक सल्ला व उत्पादनांची शिफारस, यामुळे जास्तीत जास्त शेतकरी देहात सेंटर सोबत जोडले जातात. कंपनीने शेतमालाच्या 600 हून अधिक घाऊक खरेदीदारांसोबत भागीदारी केलेली आहे, ज्यात रिटेल साखळी कंपन्या, ई-कॉमर्स, एफएमसीजी क्षेत्रातील महाकंपन्या, खाद्य प्रक्रिया उद्योग यांचा समावेश आहे. शेतमाल खरेदी करणारे देहात सेंटर कंपनीच्या माध्यमातून मालाची प्रत तपासणी, ग्रेडिंग, पॅकेजिंग करून पुढे त्याचा घाऊन खरेदीदारांना पुरवठा करू शकतात. शेतकर्यांसाठी शेतमाल विक्रीची प्रक्रिया सोपी करणे आणि त्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळवून देणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. तर देहात सेंटर्ससाठी हे उत्पन्नाचे एक अतिरिक्त स्रोत आहे. अधिक माहितीसाठी कृषी व्यावसायिकांनी देहातच्या माध्यमातून शेतकर्यांना विविध सेवा देण्यास इच्छुक असल्यास 1800-1036-110 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
