केंद्र सरकारकडून सध्या दडपशाहीचे राजकारण ः काळे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावमध्ये निषेध

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
विकासाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी व जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉकडाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचे राजकारण करीत असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेली अटक केंद्र सरकारची दडपशाही असल्याची टीका साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी केली.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर लोकशाही पद्धतीने जाहीरपणे बोलत असल्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सूडापोटी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचा वापर करून मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.25) कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक येथे नामदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून दडपशाही करीत आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार आहे. यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधव खिलारी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रीय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा जगताप, निखील डांगे, कार्तिक सरदार, सुनील फंड, सुधाकर रोहोम, विठ्ठल आसने, आनंद चव्हाण, धरमचंद बागरेचा, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, मायादेवी खरे, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर आदिंसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *