आयुर्वेदाचे महत्त्व कोरोना काळात जगाने स्वीकारले ः डॉ. शेवाळे स्वंयसिद्धा आयुर्वेद औषधालयाचे उद्घाटन संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भविष्यकाळ विचारात घेता वैद्यकीय क्षेत्रात मानवाला सुखी व निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदिक औषधे हा एकमेव पर्याय राहणार आहे. आयुर्वेदाचे महत्त्व कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाच्या लक्षात आले आहे. आयुर्वेद जगाने स्वीकारले आहे. त्यामुळे स्वंयसिद्धा कंपनीला भविष्यकाळ अतिशय उत्तम राहील, फक्त आपण गुणवत्तापूर्ण व दर्जेदार औषधे माफक दरात उपलब्ध करून द्यावीत असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संगमनेर तालुक्याचे आधारवड डॉ. माणिकराव शेवाळे यांनी केले.

स्वयंसिद्ध आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उत्पादन असलेले आयुर्वेदिक औषधालयाचे उद्घाटन संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी संगमनेर शहरात रामभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आणि मराठा सेवा संघाचे संगमनेर तालुक्याचे आधारवड डॉ. माणिकराव शेवाळे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामभाऊ कुलकर्णी यांनी शुभाशीर्वाद देताना म्हटले, आजची तिथी अंत्यंत शुभ असून संत गजानन महाराज प्रकट दिनी आपण आयुर्वेद औषधालयचे उद्घाटन केले. त्यामुळे निश्चितच आपल्या कंपनीची उत्तरोत्तर प्रगती व भरभराट होईल. आपली औषधे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्याने व माफक किंमतीची असल्याने याचा फायदा मानवी आरोग्याला निश्चितच होईल.

स्वयंसिद्धा आयुर्वेदिक कंपनीचे अध्यक्ष सतीश कानवडे म्हणाले, आम्ही तयार केलेली औषधे ही नैसर्गिक आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेले आहेत. या औषधांची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. त्यासाठी आम्ही सेंद्रीय शेतीत वनौषधी उद्यान बनविले आहे. आमचा मुख्य उद्देश मानवी आरोग्य निरोगी ठेवणे व रक्षण करणे हाच असून नागरिकांनी या गुणवत्तापूर्ण औषधांचा लाभ घ्यावा व निरोगी सदृढ जीवन जगावे, असे आवाहन केले.

Visits: 100 Today: 2 Total: 1102024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *