भावी डॉक्टरची रेल्वेखाली आत्महत्या

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील मूळ उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणार्‍या अक्षय अनिल पावसे या (वय 25) भावी डॉक्टरने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बुधवारी (ता.15) सकाळी 8 वाजेच्या सुमारास अशोकनगर परिसरात एका एक्सपे्रस रेल्वेखाली तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. मयत अक्षय पावसे हा तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता. हा तरुण मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Visits: 199 Today: 1 Total: 1954592

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *