संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे सत्ताविसावे शतक! आजही शहरात अवघे चार तर ग्रामीण भागात आढळले 43 रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या कोविड बाधित रुग्णसंख्येत आजही सरासरीनुसार भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी भागातील रुग्ण संख्येला ओहोटी तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्येला भरती आल्यासारखे चित्र आहे. आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील अवघ्या चार जणांसह एकूण 47 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 27 वे शतक ओलांडून 2 हजार 710 वर पोहोचली आहे.
आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील अवघे चार रुग्ण समोर आले. मात्र तालुक्यातील झोळे, चिंचपूर, बोटा व गुंजाळवाडी परिसरात कोविडचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाल्याचे दिसून आले. आजच्या अहवालातून शहरातील साईनगर परिसरातील 43 वर्षीय महिला, पावबाकी रोड येथील 33 वर्षीय तरुण, मालदाड रोड येथील 38 वर्षीय तरुण, येथील 70 वर्षीय महिला बाधित झाल्याचे समोर आले आहे.
यासोबतच तालुक्यातील झोळे येथून सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात 58, 41, 40 व वीस वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला, पंधरा वर्षीय बालक, सायखिंडी येथील 65 व 50 वर्षीय इसमासह 36 वर्षीय महिला व बारावर्षीय बालिका, वडगाव लांडगा येथील 28 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बाळ, चिंचपूर येथील 52, 27, व 25 वर्षीय महिलेसह 30 व 27 वर्षीय तरुण, 13 व 7 वर्षीय बालक तसेच दोन वर्षीय बाळ, देवकौठे येथील 70 वर्षीय जेष्ठ नागरिक, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पेमरेवाडी येथील 37 वर्षीय तरुण,
बोटा येथील 87, 67, 56, 43, 39 व 30 वर्षीय पुरुषांसह पंधरा वर्षीय बालक, 35 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालिका, रायतेवाडी येथील 18 वर्षीय तरुण, तसेच पंधरा वर्षीय बालक, निमगाव पागा येथील 53 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 50 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 51 व 48 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 30 वर्षीय तरुण व संगमनेर खुर्द मधील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज 47 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येने 27 वे शतक ओलांडले असून बाधितांचा आकडा 2 हजार 710 वर पोहोचला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. आजही जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ४०५ बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार १९७ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि रॅपिड अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ४०, राहाता ०१, नगर ग्रामीण ११, नेवासा ०२, श्रीगोंदा ०३, पारनेर ०३, राहुरी ०१, शेवगाव १४, कोपरगाव ०६, जामखेड ०९, कर्जत ०१, आणि इतर जिल्ह्यातील ०२ अशा ९३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतूनही जिल्ह्यात ४० रुग्ण आढळून आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र १३, राहाता ०२, नगर ग्रामीण ०४, श्रीरामपुर ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०३, अकोले ०३, राहुरी ०१, कोपरगाव ०२ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून २७२ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये, संगमनेर ४७, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०२, श्रीरामपूर ०१, लष्करी परिसर ०५, नेवासा १२, श्रीगोंदा १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातील ८७७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र २५७, संगमनेर ८२, राहाता ६७, पाथर्डी ३९, नगर ग्रामीण ५५, श्रीरामपूर ३०, लष्करी परिसर १०, नेवासा ५६, श्रीगोंदा ३१, पारनेर ३०, अकोले ५०, राहुरी ६८, शेवगाव ०३, कोपरगाव ४८, जामखेड ४१, कर्जत ३३ आणि लष्करी रुग्णालय २० अशा रुग्णांचा समावेश आहे.
- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ३२ हजार ४४८..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : ४ हजार १९७..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ६१४..
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ३७ हजार २५९..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८७.०९ टक्के..
- संगमनेरातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९१.३६ टक्के..
- आज जिल्ह्यातील ८७७ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची नव्याने पडली भर..