शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगावकरांच्या सेवेत रूजू

शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगावकरांच्या सेवेत रूजू
पन्नास खाटांची क्षमता; लोकसहभागातून सेंटरची निर्मिती
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगावातील प्रशासन व वैद्यकीय विभाग यांच्या नियंत्रणाखाली विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर, डॉक्टर, आय. एम. ए. संघटना यांनी एकत्र येत लोकसहभागातून 50 खाटांचे बेट नाका जवळील लायन्स मुकबधीर विद्यालयात शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगावकरांच्या सेवेत नुकतेच रूजू केले आहे.


कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग निर्मुलनासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल कटके, शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, शहरी आरोग्य अभियानाच्या डॉ.गायत्री कांडेकर, निवासी नायब तहसीलदार योगेश्वर कोतवाल, समन्वयक सुशांत घोडके यांचेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे सहा महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत आहे.


दिवसेंदिवस कोरोना संसर्ग रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे एस. एस. जी. एम. कॉलेज येथे सुरू असलेल्या कोरोना केअर सेंटर येथे अतिरिक्त रुग्ण ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय विभाग व स्वयंसेवी संस्था, दानशूर, डॉक्टर, आय. एम. ए. संघटना यांनी एकत्र येत लोकसहभागातून 50 खाटांचे बेट नाका जवळील लायन्स मुकबधीर विद्यालयात शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटर कोपरगावकरांच्या सेवेत रूजू केले आहे. या सेंटरमध्ये वैद्यकीय औषधोपचार सोबत लोकसहभागातून चहा, नास्ता, पाणी, दुपार व सायंकाळ जेवण अशी मोफत सेवा दिली जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णांचे समुपदेशन केले जाणार आहे.


सकाळचा चहा व नास्ता कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन, संदीप रोहमारे, मनीष कोठारी व सर्व सहकारी, दुपारचे जेवण श्री बालाजी सुपर मार्केटचे संचालक सुधीर डागा, सायंकाळ जेवण सुनाईबाई पोपटलाल बंब, सुनील बंब व परिवार, नियमित पिण्याचे पाणी सूर्यतेज संस्था व कोपरगाव नगरपालिका, जीवनधारा प्रकल्प, वापर पाणी व्यवस्थापन (अंघोळ गरम पाण्यासह) गुरसळ यांचे मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचारी करत आहेत. तसेच नियमित रुग्णांची आरोग्य तपासणी, नोंद, आरोग्य विभाग, पंचायत समिती कोपरगाव, डॉ.संतोष विधाटे, इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव यांचेवतीने डॉ.मयूर जोर्वेकर, आय. एम. ए. सदस्य डॉ.अमोल अजमेरे, डॉ.अमरीश मेमाणे यांचेसह डॉक्टर सेवा देणार आहेत. याच बरोबर सनरायझर ग्रुपचे डॉ.अजय गर्जे, डॉ.चंद्रशेखर आव्हाड व सर्व सदस्य मोबाईलद्वारे आरोग्य समुपदेशन करणार आहेत. रुग्ण तणावमुक्ती समुपदेशनकरिता रा. स्व. संघ सेवाकार्य विभागाच्या दीपाली पटवर्धन, वृंदा कोर्‍हाळकर, अ‍ॅड.जयंत जोशी यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कार्य करणार आहेत. रुग्णांना अन्न व औषध सेवा देण्यासाठी प्रशिक्षित नियुक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तर स्वच्छतेस आरोग्य विभाग पालिकेच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त सफाई कर्मचारी करणार आहे. अत्यावश्यक 108 क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची गरज ओळखून प्रशासन आणि लोकसहभागातून सुरू झालेल्या शुक्रतीर्थ कोरोना केअर सेंटरबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 23117

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *