जिल्ह्यावर आदळली कोविड संक्रमणाची तिसरी लाट! नगर शहरात पाचशेहून अधिक तर तीन तालुक्यातील रुग्णसंख्या शतकाच्या पार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कोविड संक्रमणाची तिसरी लाट आदळली असून आज आठ महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या समोर आली आहे. आजच्या चाचण्यांमधून अहमदनगर महापालिका क्षेत्रात तब्बल 522 रुग्ण आढळले असून नगर तालुका, राहाता व पारनेर तालुक्यात शंभराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातून आज 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण रुग्णसंख्या 35 हजार 57 झाली आहे तर तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दिडशेच्या पार पोहोचली आहे. जिल्ह्यात आज उच्चांकी 1 हजार 432 रुग्ण आढळले असून सक्रीय रुग्णांची संख्याही आता साडेपाच हजारांवर गेली आहे.
मागील 5 जानेवारीपासून जिल्ह्यातील कोविड बाधित समोर येण्याची गती वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, नगर तालुका, श्रीरामपूर, अकोले, पारनेर, कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, संगमनेर राहुरी, नेवासा व शेवगाव तालुक्याची सरासरी रुग्णगतीही आता दहापेक्षा अधिक आहे. महापालिका क्षेत्राच्या सरासरीने तर आता शंभरीही ओलांडली असून गेल्या अठरा दिवसांत तेथून सरासरी 134 रुग्णांच्या गतीने 2 हजार 415 रुग्ण सापडले आहेत. त्या खालोखाल राहाता तालुक्यातून सरासरी 41 रुग्णगतीने 740 रुग्ण सापडले आहेत. नगर तालुका (कंसात रोजची सरासरी) 536 रुग्ण (30), श्रीरामपूर 365 (20), अकोले 346 (19), पारनेर 320 (18), कोपरगाव 286 (16), पाथर्डी 268 (15), श्रीगोंदा 265 (15), संगमनेर 251 (14), राहुरी 176 (10), नेवासा 176 (10), कर्जत 112 (6) व जामखेड 103 (6) या गतीने रुग्ण समोर आले आहेत.
गेल्या मोठ्या कालावधीनंतर संगमनेर तालुक्यातून आज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. आजच्या अहवालातून शहरातील सतरा जणांसह एकूण 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात मोमिनपूर्यातील 31 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 56 वर्षीय इसमासह 32, 25, 24 व 18 वर्षीय तरुण, बालाजी नगरमधील 42 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी व 16 वर्षीय मुलगा, शहर पोलीस ठाण्यातील 56 वर्षीय पोलीस कर्मचारी, जोर्वे नाका येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 35 व 32 वर्षीय तरुणांसह 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुक्याच्या ग्रामीणभागातील अठरा गावे व वाड्यावस्त्यांमधून आज 31 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून त्यात कोल्हेवाडी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, ओझर येथील 23 वर्षीय महिला, निमोण येथील 32 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय तरुणी, निमगाव कोर्हाळे येथील 19 वर्षीय तरुणी, वडगाव पान येथील 45 वर्षीय महिला, साकूर येथील 25 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 54 व 44 वर्षीय इसमासह 40 व 33 वर्षीय तरुण, 37 वर्षीय महिलेसह 19 व 18 वर्षीय तरुणी व दोन वर्षीय बालिका,
घारगाव येथील 72 वर्षीय महिला, गोल्डनसिटीतील 23 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 48 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील 48 वर्षीय इसम, जोर्वे येथील 50 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण, जुनेगाव येथील 56 वर्षीय इसम, पारेगाव बु. येथील 21 वर्षीय तरुण, पावबाकीतील 40 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 31 वर्षीय तरुण व वडगाव लांडगा येथील 85 व 32 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय तरुण अशा एकूण 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 35 हजार 57 झाली आहे, तर सक्रीय रुग्णांची संख्याही दिडशेच्या पार पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज गेल्या आठ महिन्यातील उच्चांकी 1 हजार 432 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधीक 522 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रात तर नगर तालुका 119, राहाता 113, पारनेर 109, श्रीरामपूर 78, पाथर्डी 73, नेवासा 52, इतर जिल्ह्यातील 49, संगमनेर व अकोले प्रत्येकी 48, कोपरगाव व कर्जत प्रत्येकी 34, राहुरी 30, जामखेड 28, शेवगाव 27, श्रीगोंदा 25, लष्करी रुग्णालय 20, भिंगार लष्करी परिसर 19 व इतर राज्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 66 हजार 323 वर पोहोचली आहे. मागील अवघ्या तीनच दिवसांत जिल्ह्यात सरासरी 1 हजार 70 रुग्ण दररोज या मोठ्या गतीने 3 हजार 208 रुग्णांची भर पडली आहे.