वाळूच्या वाहनांचे टायर व डिस्कची चोरी करणार्यास अटक
वाळूच्या वाहनांचे टायर व डिस्कची चोरी करणार्यास अटक
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले पोलीस ठाण्याच्या आवारातील अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांच्या टायर व डिसकची चोरी झाली असून पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.

अकोले पोलिसांनी गणेश शंकर आवारी यांचे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन (एमएच.26, एजी.2605) आणि दोन ब्रास वाळूसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून ठेवलेले होते. या वाहनांच्या टायर व डिस्कची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून विनायक नरहरी साबळे यास ताब्यात घेतले होते. पोलीस नाईक महिला कारकून गोंदके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात विनायक साबळे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी झाल्याने खळबळ उडाली असून यात पोलीस ठाण्यातील कोणी सामिल आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करत आहे.

