चंदुकाका सराफच्या वतीने अकोल्यात सोन्यासह हिर्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन! असंख्य ऑफर्स आणि सवलतींसह नाविन्यपूर्ण दागिने खरेदी करण्याची अकोलेकरांना संधी..
नायक वृत्तसेवा, अकोले
दोन शतकांची विश्वसनीय परंपरा असलेल्या बारामतीच्या चंदुकाका सराफ ज्वेलर्सकडून अकोलेकरांसाठी ‘विशेष’ सोन्याच्या आणि हिर्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार 18 ते रविवार 21 नोव्हेंबर या कालावधीत अकोल्यातील गजानन एजन्सीज्, सारडा संकुल येथे होणार्या या प्रदर्शनात पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक आणि कलात्मक रचनेचे दागिने बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहे. याशिवाय केवळ 9 हजार 999 रुपये भरुन हिरेजडीत सुवर्णहार मासिक हप्त्याने खरेदी करण्याची संधीही मिळणार आहे. या प्रदर्शनात हिर्यांच्या दागिन्यांवरील मजूरीतही शंभर टक्के सुट दिली जाणार आहे. चार दिवस चालणार्या या सुवर्ण प्रदर्शनाचा अकोलेकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांच्याकडून करण्यात आले आहे.
शुद्धता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर 1827 सालापासून ग्राहकांची निरंतर सेवा करणार्या चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स प्रालि. यांचे संगमनेरातील बसस्थानक संकुलात अलिशान दालन आहे. आपल्या दालनातून विक्री होणारा प्रत्येक दागिना होलमार्क प्रमाणितच असायला हवा हे सूत्र सोबत घेवून संगमनेरात सुरु झालेल्या या दालनाला संगमनेर-अकोलेकरांनी पसंदी दिली आहे. दागिना म्हणजे चंदुकाकांचाच हा विश्वासही या माध्यमातून त्यांनी ग्राहकांच्या मनात निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये असणार्या अलिशान दालनांमधून चंदुकाका सराफ यांनी विश्वासाची 195 वर्ष साजरी केली आहेत.
अकोले तालुक्यातील ग्राहकांना आधुनिक व कलात्मक दागिन्यांसह हिर्यांच्या दागिन्यांची आपल्याच शहरात खरेदी करता यावी यासाठी चंदुकाका सराफ यांच्यावतीने उद्या गुरुवार 18 ते रविवार 21 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत गजानन एजन्सीज्, सारडा व्यापारी संकुल, सारडा पेट्रोल पंपाजवळ, अकोले येथे हे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात सोन्याच्या विविध आकार आणि प्रकारच्या दागिन्यांसह हिरेजडीत असंख्य दागिने प्रत्यक्ष पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या निमित्ताने सोने व हिर्यापासून बनविलेला रत्नजडीत हार केवळ 9 हजार 999 रुपये भरुन उर्वरीत रक्कम मासिक हप्त्यांवर भरण्याच्या अटीवर ग्राहकांना खरेदी करता येईल. यासोबतच सोने खरेदी करणार्यांना चांदी मोफत, हिर्याच्या दागिन्यांवर शंभर टक्के मजुरी फ्रि, फॉर्मिंग दागिने व गिफ्ट आर्टिकलच्या रुपये 3 हजार 500 च्या खरेदीवर 5 टक्के तर त्यापुढील खरेदीवर 10 टक्क्यांची घसघशीत सुट दिली जाणार आहे.
चंदुकाका सराफ यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व दालनांमध्ये सुरु असलेल्या कल्पतरु व गोल्ड ट्री प्लस या योजनेत मासिक 3000 रुपये भरुन सहभागी होण्याची संधीही या प्रदर्शनातून अकोलेकरांना मिळणार आहे. यानिमित्ताने या योजनेत सहभागी होणार्यांना चांदीचे एक नाणेही भेट म्हणून मिळणार आहे. याशिवाय चार दिवस चालणार्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी असंख्य ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक दागिना होलमार्क प्रमाणितच असलेल्या चंदुकाका सराफ यांच्या या अलंकारांच्या या प्रदर्शनात ग्राहकांना सोने व चांदीची शुद्धता तपासता यावी यासाठी कॅररेमीटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय डेबीट अथवा क्रेडीट कार्डद्वारे पैसे अदा करणार्यांकडून कोणतेही अतरीक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. हलक्या वजनाचे वैविध्यपूर्ण डिझाईन्सचे दागिने, सर्टिफाईड हिरे व राशीरत्न तसेच प्रत्येकाला मोहात पाडतील अशा अप्रतिम सोन्याच्या व हिरेजडीत दागिन्यांच्या या प्रदर्शनाचा अकोलेकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स प्रा.लि.यांच्यावतीने करण्यात आले आहे.