लॉक खोलता येईना म्हणून दुचाकीची चाकेच चोरली…!

लॉक खोलता येईना म्हणून दुचाकीची चाकेच चोरली…!
नायक वृत्तसेवा, नेवासा
गाडीचे लॉक खोलता येईना म्हणून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची दोन्हीही चाके चोरून नेल्याची घटना नुकतीच नेवासा शहरातील मध्यवस्तीत घडली आहे. याबाबत भुरट्या चोरांचा तपास लावावा व रात्रीची गस्त पोलिसांनी सुरू करावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


मंगळवारी (ता.15) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नेवासा शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील हॉटेल अर्चना शेजारील परिसरातील रहिवासी वकील उद्धव कार्ले यांची बजाज कंपनीची प्लॅटीना ही दुचाकी घराबाहेर लावलेली होती. तिची दोन्ही चाके चोरट्यांनी चोरून नेली. अगोदर गाडीला लॉक असल्याने चोरट्यांना गाडी चोरून नेता आली नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही चाकेच चोरुन नेली आहे. दरम्यान, शहर व परिसरात वारंवार चोरीचे प्रकार घडत असतात. रात्रीच्या सुमारास या परिसरामध्ये लांबपर्यंत अंधार असल्याने भीतीचे व चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरात नगरपंचायतने पथदिवे बसवावे आणि पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे नेवासा शहराध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी केली आहे.

Visits: 81 Today: 1 Total: 1108224

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *