देवकौठे गावातील सिमेंट बंधारे तुडूंब भरल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण

देवकौठे गावातील सिमेंट बंधारे तुडूंब भरल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या निधीतून बांधलेले बंधारे ठरताहेत नवसंजीवनी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्‍या देवकौठे गावात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विविध विकास कामांसह त्यांच्या निधीतून बांधलेल्या 11 सिमेंट बंधारे हे पावसाचे व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने तुडूंब भरल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.


तळेगाव पट्ट्यातील देवकौठे हे गाव टोकावर असून या गावात कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. त्यामुळे तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून देवकौठे गावाचा उल्लेख होतो. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सुबत्ता आलेल्या या गावांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून अकरा सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. याचबरोबर नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या निधीतून दोन बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या तळेगाव भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहेत.


यावर्षी या परिसरातही खूप चांगला पाऊस झाला आहे. या बरोबरच कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलाव मार्गे देवकौठेपर्यंत पोहोचले. पावसाचे व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठेमधील सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत. सुमारे 14 वर्षांनी देवी नदीही वाहती झाली आहे. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याही वर्षी हे पाणी आणण्यासाठी बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, भागवत आरोटे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, अशोक मुंगसे, अनिल गाजरे, ज्ञानेश्वर मुंगसे, अण्णा शेवकर, नामदेव कहांडळ यांसह विविध कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीचे पाणी निमोण, तळेगाव भागातील प्रत्येक गावात देण्यासाठी दररोज आढावा घेतला असून इंद्रजीत थोरात यांनी या कामाचा पाठपुरावा केला. मंत्री थोरात यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असूनही तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती व विविध गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या व्यापातूनही दररोज वेळ काढून मंत्री थोरात हे कायम आढावा घेत आहे.
– सुभाष सांगळे (उपाध्यक्ष, तालुका युवक काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *