नेवासा पोलिसांत पुन्हा ऑडिओ बॉम्ब पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा पोलीस आणि खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिप आता हे समीकरणच झाले असून दोन महिन्यानंतर पुन्हा मंगळवारी (ता.5) सायंकाळी वाहतूक शाखेचा एक पोलीस व प्रवासी वाहतूक करणार्‍या व्यक्तीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेवासा पोलीस पुन्हा चर्चेत आले आहे.

नेवासा पोलिसांची सर्वप्रथम अप्पर पोलीस अधीक्षक-एका पोलीस कॉन्स्टेबलचे संभाषण, त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे (ता.11) ऑगस्टला पोलीस निरीक्षक व वाळू तस्कर, त्यानंतर दोनच दिवसांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल व वाळू तस्कर यांचा मध्यस्थी या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच आज वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी व प्रवासी वाहतूक करणार्‍यांमध्ये झालेल्या संभाषणाची पोलिसांची चौथी ऑडिओ क्लिप मंगळवारी व्हायरल झाली आहे.

दरम्यान, या कथित क्लिपमध्ये परवानाधारक व अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविषयी वादाची चर्चा आहे. यात स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचार्‍यांसह अनेक व्यक्तीच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपवर पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

सदर ऑडिओ क्लिप मी अजून ऐकली नाही. ऐकल्यानंतर योग्य तपास करून पुढील कारवाई करू.
– बाजीराव पोवार (पोलीस निरीक्षक, नेवासा)

Visits: 11 Today: 1 Total: 79813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *