संगमनेर तालुक्याने ओलांडला 33 हजार रुग्णसंख्येचा टप्पा! तालुका पुन्हा दिडशेच्या पार; ग्रामीणभागातील संक्रणात चिंताजनक वाढ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरासह जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाची गती खाली येवूनही संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र अजूनही भरातच आहे. त्यातच आज तालुक्याच्या संक्रमणात पुन्हा वाढ झाल्याने तालुका आरोग्य व्यवस्थेच्या चिंता दुप्पट झाल्या आहेत. एकीकडे वरीष्ठ पातळ्यांवरुन आदेशामागून आदेशाची रिघ लागलेली असतांना दुसरीकडे त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने तालुका पुन्हा एकदा कोविडच्या सावटाखाली आला आहे. रुग्णवाढीची श्रृंखला आजही कायम असून गेली तीन दिवस खालावलेली रुग्णगती आज पुन्हा एकदा चढाला लागली असून शहरातील अकरा जणांसह तालुक्यातील 155 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने आता 33 हजार रुग्णसंख्येचा डोंगर ओलांडून 33 हजार 13 रुग्णसंख्या गाठली आहे.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येचा वेग खालावत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असतांना संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, अकोले व पाथर्डी तालुक्यातील संक्रमणात मात्र एकसारखी वाढ होत असल्याने जिल्ह्याची एकूण अवस्था बिघडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात कोविड संक्रमणाचा जबरदस्त धक्का सहन करणार्या या पाचही तालुक्यातून घडल्या प्रकारातून अजूनही बोध घेतला नसल्याने या तालुक्यातील जवळपास सर्व गावांमध्ये कोविड संक्रमण अद्यापही टिकून आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीचा वेग जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याने तालुक्याची आजची अवस्था चिंताजनक असतांनाच पुढील आठवठ्यात पाचवीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याच्या चांगल्या-वाईट परिणांमाची चिंताही आता समोर येवू लागली आहे.
आज शासकीय पयोगशाळेचा अवघा एक, खासगी प्रयोगशाळेचे 85 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून समोर आलेल्या 69 अहवालातून संगमनेर शहरातील 11, ग्रामीण भागातील 141 व अकोले तालुक्यातील तिघांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात शहरातील ताजणे मळा परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह आठ वर्षीय मुलगा, चंद्रशेखर चौकातील 43 वर्षीय इसम, सराफ कॉलनीतील 65 वर्षीय महिला, संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 55, 35, 31 व 25 वर्षीय महिला, 32 व 25 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणी तसेच अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 38 वर्षीय महिला व हिवरगाव आंबरे येथील 51 व 30 वर्षीय महिलांना कोविडचे संक्रमण झाले आहे.
याशिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागातील संक्रमणातही आज वाढ झाल्याचे समोर आले असून आजच्या अहवालातून तालुक्यातील 61 गावे आणि वाड्यावस्त्यांमधून रुग्ण समोर आले आहेत. त्यात खंडेरायवाडीतील 45 वर्षीय इसम, आनंदवाडीतील 26 व 24 वर्षीय तरुणांसह 16 वर्षीय मुलगा, वडगाव लांडगा येथील 58 व 45 वर्षीय दोघा इसमांसह 36, 30 व 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय मुलगा व 12 वर्षीय मुलगी, कुरकुंडीतील 18 वर्षीय तरुण, देसावडे येथील 65 वर्षीय महिला, पारेगाव बु. येथील 73 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 55 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, पारेगाव खुर्द येथील 21 वर्षीय तरुण, नांदूर येथील 56 वर्षीय इसम, समनापूर येथील 48 व 25 वर्षीय महिला,
पिंपळगाव माथा येथील 66 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण, साकूर येथील 65 वर्षीय महिला, पानोडीतील 33 व 30 वर्षीय तरुणांसह 30 व 25 वर्षीय महिला, जाखुरी येथील 36 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 70, 65, 52 व 46 वर्षीय महिलांसह 22 वर्षीय तरुणी, पिंपरी येथील 32 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 36 वर्षीय तरुण, पावबाकीतील 35 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगी, जवळे कडलग येथील 51 वर्षीय इसम, मांडवे फाटा येथील 48 वर्षीय इसम, अकलापूर येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नान्नज दुमाला येथील 27 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडगाव लांडगा येथील 46 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 58 व 50 वर्षीय इसमांसह 56, 50, 36 व 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय दोघे तरुण व 14 वर्षीय मुलगा,
रायतेवाडीतील 23 वर्षीय महिला, करुले येथील 65 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 55 व 33 वर्षीय महिलांसह 35 व 29 वर्षीय तरुण, डिग्रस येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 43 वर्षीय महिला, मालदाड येथील 45 व 26 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68, 60 व 39 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, सादतपूर येथील 89 वर्षीय महिला, जोर्वे येथील 24 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 40 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 56 वर्षीय इसम, दाढ खुर्द येथील 32 वर्षीय महिला, घारगाव येथील 55 वर्षीय इसमासह 39 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 26 वर्षीय तरुण,
आश्वी खुर्द येथील 56 व 55 वर्षीय इसमांसह 39 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 32 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 52 व 48 वर्षीय इसम, 40 व 39 वर्षीय तरुण, 48, 35 वर्षीय दोघी, 30 व 25 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, 16 व 9 वर्षीय मुली व आठ वर्षीय मुलगा, मांडवदरा येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, निमगाव जाळी येथील 18 व 17 वर्षीय तरुणी, कौठे कमळेश्वर येथील 45 वर्षीय इसम, वडझरी बु. येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय महिला, पेमगिरीतील 11 वर्षीय मुलगी, भोजदरी येथील 37 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 49 वर्षीय महिला, शेडगाव येथील 28 व 18 वर्षीय तरुणांसह 18 वर्षीय तरुणी,
निमोण येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 43 वर्षीय दोघे इसम, 40 व 30 वर्षीय तरुण व आठ वर्षीय मुलगा, पिंपरणे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला, चिखलीतील 36 व 31 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 45 वर्षीय इसम, आश्वी बु. येथील 61 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, बहिरवाडीतील 22 वर्षीय तरुणी, देवगाव येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 31 वर्षीय तरुण, खळी येथील 37, 28 व 26 वर्षीय तरुणांसह 16 वर्षीय मुलगा, उंबरी बाळापूर येथील 40 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 50 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 27 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण व मालुंजे येथील 65 वर्षीय महिलेचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात आज 836 रुग्णांना डिस्चार्ज तर 633 रुग्णांची नव्याने वाढ..
संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत आज मोठी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येवर झाला असून मंगळवारी पाचशेच्या आंत आलेली रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा सहाशेच्या पल्याड गेली आहे. आज समोर आलेल्या एकूण अहवालातून संगमनेर 155, पारनेर 79, श्रीगोंदा 74, राहाता 65, कर्जत 31, अहमदनगर महापालिका क्षेत्र व नगर तालुका प्रत्येकी 29, पाथर्डी 28, कोपरगाव 25, शेवगाव 23, अकोले व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी 18, नेवासा व राहुरी प्रत्येकी 17, श्रीरामपूर 15, जामखेड आठ व लष्करी रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 44 हजार 870 झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 33 हजार 419 तर एकूण 6 हजार 828 जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यातील 4 हजार 623 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचा जिल्ह्याचा सरासरी दर 96.68 टक्के आहे.