संगमनेरसह सहा तालुक्यांमधून समोर आले पुन्हा तीन आकडी रुग्ण! दिवसाआड कमी-अधिक रुग्णसंख्येचे धक्के; जिल्ह्यात आजही संगमनेर अव्वलस्थानी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या एकूण सरासरी रुग्णगतीत चालू महिन्यात मोठी घट झाली असली तरीही संगमनेरसह श्रीगोंदा, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील रुग्णांमध्ये वाढ होण्याची श्रृंखला मात्र कायम आहे. बुधवारी दोन महिन्यातील सर्वाधीक निचांकी रुग्णसंख्या समोर आलेल्या संगमनेर तालुक्यात आज पुन्हा तीन आकडी रुग्ण आढळले असून शहरातील 22 जणांसह 136 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच बुधवारी पाथर्डी वगळता उर्वरीत सर्व तालुक्यातील रुग्णसंख्या दोन आकड्यात आली होती, आज मात्र त्यातही वाढ होवून संगमनेरसह अन्य पाच तालुक्यात शंभराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दिवसाआड कमी-अधिक रुग्णसंख्येचे धक्के बसत आहेत. संगमनेर तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येला 22 हजारांच्या नजीक 21 हजार 939 वर नेवून पोहोचवले आहे. आजच्या स्थितीत तालुक्यात 588 रुग्णांवर उपचार सुरु असून तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दरही आता 96.86 टक्के झाला आहे.


गेल्या महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक निर्माण केल्यानंतर शेवटच्या आठवड्यात रुग्णगतीला ओहोटी लागली. त्यामुळे सलग दोन महिने उच्चांकी रुग्णसंख्या, रुग्णालयातील खाटांची कमतरता, ऑक्सिजनसह रेमडेसिवीरसारख्या लशींचा तुटवडा यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती अनुभवणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दररोज सरासरी चार हजारांहून अधिक रुग्ण समोर येत गेल्याने निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीला ब्रेक लागून जवळपास गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णगती दोन हजारांच्या आंत आल्याने रुग्णसंख्येचा फुगवटा ओसरुन आरोग्य यंत्रणांवरील वाढलेला ताणही पूर्णतः नियंत्रणात आला. जिल्ह्यातील अहमदनगर महापालिका क्षेत्र, नगर ग्रामीण, राहाता, श्रीरामपूर व कोपरगाव या तालुक्यातून आश्‍चर्यकारकरित्या कोविडची मोठी माघार झाल्याने जिल्हा दुसर्‍या संक्रमणातून बाहेर पडत असल्याचेही चित्र दिसू लागले. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यातील संक्रमण अजूनही जोमात असल्याचे दिवसाआड समोर येत असून संपूर्ण यंत्रणेला अशा तालुक्यांवर लख्य केंद्रीत करावे लागत आहे.


बुधवारी (ता.2) संगमनेर तालुक्यात गेल्या दोन महिन्यातील सर्वाधीक निचांकी 59 रुग्ण समोर आले होते. त्यामुळे सलग रुग्णवाढीचे शिखरे पाहणार्‍या तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र आज समोर आलेल्या जिल्ह्यातील उच्चांकी रुग्णसंख्येने त्यावर पाणी फेरले आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 38, खासगी प्रयोगशाळेच्या 70 आणि रॅपीड अँटीजेनच्या 28 निष्कर्षातून संगमनेर तालुक्यातील 136 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर शहरातील 22 जणांसह अन्य तालुक्यातील दोघे आणि ग्रामीणभागातील 112 जणांचा समावेश आहे. मागील तीन दिवसांचा विचार केल्यास तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक 348 रुग्ण समोर आले असून रुग्ण समोर येण्याची तालुक्याची दैनंदिन सरासरीही 116 रुग्णांवर पोहोचली आहे. अर्थात मागील महिन्याचा विचार करता सद्यस्थितीतली सरासरी निम्म्याहून कमी आहे, मात्र आजच्या स्थितीत ती जिल्ह्यातील सर्वाधीक आहे.


आजच्या एकूण अहवालात संगमनेर शहरातील इंदिरा नगर येथील 38 वर्षीय तरुण, नेहरु चौकातील 45 वर्षीय इसम, मोमीनपूर्‍यातील 46 वर्षीय महिला, साळीवाड्यातील 23 वर्षीय तरुण, जोर्वे नाका परिसरातील 30 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 21 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 10 वर्षीय बालिका, शहर पोलीस कार्याल्याजवळील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गणेश नगरमधील नऊ वर्षीय मुलगा आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 84 व 76 वर्षीय वयोवृद्ध इसमांसह 55, 52 व 45 वर्षीय इसम, 38 वर्षीय दोघे व 25 वर्षीय दोघे तरुण, 70 वर्षीय दोन महिला, 21 वर्षीय तरुणी आणि 13 वर्षीय मुलगा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


त्यासोबतच तालुक्यातील 51 गावे व वाड्या-वस्त्यांवरील 112 जणांनाही कोविडचे संक्रमण झाले असून त्यात झोळे येथील 18 वर्षीय तरुणीसह 14 वर्षीय मुलगा, चंदनापूरीतील 19 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 29 व 26 वर्षीय तरुण, कर्जुले पठार येथील 45 वर्षीय इसम, मालुंजे येथील 40 वर्षीय तरुण, पानोडी येथील 35 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 32 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 48 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, माकडवाडीतील 29 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 58 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, चणेगाव येथील 48 वर्षीय इसमासह सहा वर्षीय बालक, निमोण येथील 58 वर्षीय इसम, पावबाकीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वेल्हाळे येथील 85 वर्षीय वयोवृद्धासह 50 वर्षीय इसम,


पिंपळे येथील 42 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा, साकूर येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षीय इसम, 39 वर्षीय तरुण, 22 वर्षीय महिला व चार वर्षीय बालिका, वडगाव पान येथील 32 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 57 वर्षीय इसम, चिंचेवाडीतील 63 वर्षीय महिला, कनकापूर येथील 34 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 27 वर्षीय तरुण, माळवाडीतील 65 व 26 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 50 वर्षीय इसम, कोठे बु. येथील 45 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 40 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 50 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, हसनापूर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, लोहारे येथील 42 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी,


आश्‍वी खुर्द येथील 65 वर्षीय दोघे ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव माथा येथील 25 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 50 वर्षीय इसम, चिखलीतील 28 वर्षीय महिला, पिंप्री येथील 50 व 48 वर्षीय इसमांसह 34 व 22 वर्षीय तरुण आणि 35 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 70, 65 व 34 वर्षीय महिला, 39 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगा व 14 वर्षीय मुलगी, निमगाव जाळीतील 52 वर्षीय इसमासह 36 व 21 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 18 वर्षीय दोघी तरुणी, डिग्रस येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कौठे कमळेश्‍वर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 50 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालक, कोकणगाव येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 व 32 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणी,


बोटा येथील 40 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगा, मालदाड येथील 55 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पेमगिरी येथील 40, 23 व 18 वर्षीय तरुणांसह 35, 25 व 22 वर्षीय महिला, हंगेवाडीतील 48 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 87 वर्षीय वयोवृद्ध इसम, घुलेवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय दोन इसम, 40, 28, 25 व 20 वर्षीय दोन तरुण आणि 70 व 35 वर्षीय महिला, कनोली येथील 75 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 49 वर्षीय दोन इसम, 44 वर्षीय दोन महिला आणि 19 वर्षीय तरुण आणि निमगाव बु. येथील 44 वर्षीय इसम तसेच अन्य तालुक्यातील प्रवरा संगम येथील 30 व 29 वर्षीय तरुण अशा एकूण 136 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 939 झाली आहे.


जूनमध्ये दिवसाआड जिल्हा हजाराच्या अल्याड-पल्याड!
गेल्या तीन दिवसांत जिल्ह्याची रुग्णसंख्या दोनवेळा हजारांच्या पल्याड तर बुधवारी हजाराच्या अल्याड आल्याने जिल्ह्यात रुग्णसंख्येचा धुपछाँवचा खेळ पहायला मिळत आहे. बुधवारी 848 रुग्णसंख्या समोर आलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आज त्यात मोठी वाढ होवून 1 हजार 326 रुग्ण आढळले. आजच्या एकूण रुग्णसंख्येत जिल्ह्यातील सहा तालुक्यांत शंभराहून अधिक रुग्ण आढळले असून सर्वाधीक 136 रुग्ण संगमनेर तालुक्यातून समोर आले आहेत. त्या खालोखाल जामखेड 127, नगर ग्रामीण 123, पारनेर 116, श्रीगोंदा 103, अकोले 100, शेवगाव 91, पाथर्डी 87, नेवासा 77, अहमदनगर महापालिका क्षेत्र 68, कोपरगाव 64, राहुरी 58, कर्जत 57, श्रीरामपूर 51, राहाता 48, इतर जिल्ह्यातील 12, भिंगार लष्करी परिसरातील चार, लष्करी रुग्णालय व अन्य राज्यातील प्रत्येकी दोन रुग्णांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 65 हजार 471 झाली आहे.

Visits: 291 Today: 2 Total: 1426628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *