स्व.सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण
स्व.सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ईपीएस-95 पेन्शनर्स कल्याणकारी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.भाऊसाहेब विठ्ठल सोनावणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवारी (ता.13) वृक्षारोपण करून त्यांना संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्व.सोनवणे हे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवासी होते. ेसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात हेड टाईमकीपर या पदावर 32 वर्षे उत्कृष्ट सेवा केली. सर्व कामगार अधिकारी वर्गामध्ये ते लोकप्रिय होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. संगमनेर तालुक्यात अल्पपेन्शनधारकांची संघटना उभी करण्यात त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले होते. वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे दु:खद निधन झाले. संघटनेचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक मुकला असून आम्हांला त्यांची सतत उणीव भासत राहील, अशी श्रद्धांजली राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी वाहून उपस्थितांच्या हस्ते ‘माझे घर’ सोसायटीच्या साई मंदिरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी घुलेवाडी गृहनिर्माण सोसायटीचे सचिव विजय भावसार, पेन्शनर्स संघटना चिटणीस अशोक देशमुख, कैलास हासे, भाऊसाहेब नवले, रंगनाथ खतोडे, विजय सोमवंशी, राजेंद्र सोनवणे, संपत मोकळ, रावबा नाईकवाडी, लंके आदिंनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळून उपस्थित होते.