जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार धुमाळ यांना जाहीर
जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार धुमाळ यांना जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सुशीला धुमाळ (शेळके) यांना जाहीर झाल्याबद्दल शुक्रवारी (ता.11) त्यांचा पंचायत समिती सभागृहात सत्कार करण्यात आला.
दरवर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेकडून उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा (2020-21) पुरस्कार उपक्रमशील शिक्षिका धुमाळ यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्तार अधिकारी के. के. पवार, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.