आरोपी पित्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
उचल घेतलेले पैसे बुडविण्यासाठी दहा महिन्याच्या चिमुकल्याचा गळा घोटणार्‍या आरोपी पित्याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढील सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी (ता.3) दिले.

आरोपी श्रावण बाळनाथ अहिरे (वय. 40, रा. हिरेनगर, ता. नांदगाव, जि. नाशिक) या मेंढपाळ मजुराने मालक संतोष गोराणे यांच्याकडून अडीच लाख रुपयांची उचल घेतली होती. मालकाकडून घेतलेले पैसे बुडविण्यासाठी आरोपी पित्याने स्वतःचा दहा महिन्याचा मुलगा सोपान अहिरे याचा गळा घोटण्याचा धक्कादायक गुन्हा येथील एमआयडीसी परिसरात गुरुवारी (ता.3) पहाटेच्या सुमारास घडला होता. वरहष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून पाहणी केली होती. त्यानंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरणीय तपासणी केली. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ अटक केली. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी सकाळी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता बुधवार (ता. 8) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवडे यांनी दिली.

Visits: 89 Today: 2 Total: 1101954

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *