सुमित शिर्के आत्महत्याप्रकरणी दोघींवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के या तरुणाने गळफास लावून नुकतीच आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील आई व तरुणी विरोधात गुरुवारी (ता.2) अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मयत सुमित शिर्के याचे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रेखा नंदू वाकचौरे या महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांचे पाच ते सहा महिने प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर या प्रेम प्रकरणातील मुलीने व तिच्या आईने सुमितकडे पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली होती. यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. 8 ऑगस्टला प्रेयसीची आई रेखा वाकचौरे ही कळस बुद्रुक येथे त्याच्या घरी आली. यावेळी तिने त्याच्याकडे व त्याच्या आईकडे 50 हजार रुपयांची मागणी केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याव वैतागून सुमितने सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूला घुलेवाडी येथील रेखा वाकचौरे व तिची मुलगीच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सविता मंगेश शिर्के यांनी अकोले पोलिसांत उशिरा फिर्याद दिली. यावरुन मुलीच्या प्रेमाचा धंदा करणार्या आई व मुलीविरुद्ध पेालिसांनी भारतीय दंड संहिता कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे हे करत आहे.
