कुरकुंडी येथे महिला बचत गट भवनची स्थापना

नायक वृत्तसेवा, घारगाव
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुंडी गावात महिला बचत गट भवन बांधण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील महिला बचत गटांना या भवनचा चांगलाच फायदा होणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लागावी आणि छोटे-मोठे व्यवसाय करण्याच्या हेतूने बचत गटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पठारभागातील डोंगरदर्‍यांत वसलेल्या कुरकुंडी येथे मोठ्या संख्येने बचत गट आहेत. त्यांना बैठका आणि इतर उपक्रम घेण्यासाठी प्रशस्त जागा व कार्यालयाची गरज होती. त्यादृष्टीने गावातील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांनी जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून या भवनची निर्मिती करण्यात आली आहे. याचा बचत गटांना मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील हे पहिलेच भवन असण्याची शक्यता आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 30624

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *