पद्मावती हिरोतर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘गुरुदक्षिणा ऑफर’

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दहा कोटी गाड्यांची विक्री करणारी जगातील एकमेव कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि संगमनेर येथील पद्मावती हिरो यांच्यातर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘गुरुदक्षिणा ऑफर’ योजना सादर करण्यात आली आहे. हिरोच्या स्कूटर खरेदीवर चार हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि मोटरसायकल खरेदीवर दोन हजार रुपये कॅश डिस्काउंट शिक्षकांना देण्यात येणार आहे.

या ऑफरचा कालावधी 15 सप्टेंबरपर्यंत आहे. शासकीय किंवा खासगी शाळांमधील शिक्षकांनी पद्मावती हिरोमधून हिरोची प्लेझर प्लस, डेस्टिनी 125, माइस्ट्रो एज 125 यापैकी कोणतीही स्कूटर खरेदी केल्यास चार हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर या शिक्षकांनी हिरोची कोणतीही मोटारसायकल खरेदी केली, तरी त्यांना दोन हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी ओळखपत्र, शाळेचे पत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.

तसेच नवीन गाडी खरेदीसाठी हिरो फिनकॉर्पतर्फे फक्त 6.99 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. त्याशिवाय श्रीराम सिटी, एचडीएफसी, इंडसइंड बँक, एलटी फायनान्स, एचडीबी, आयसीआयसीआय यांच्यातर्फे कमीत डाऊन पेमेंटवर गाडी देण्यात येणार असल्याची माहिती पद्मावती हिरोतर्फे देण्यात आली. तरी जिल्ह्यातील शिक्षक बांधव व भगिनींनी ‘गुरुदक्षिणा ऑफर’चा फायदा घ्यावा असे आवाहन पद्मावती हिरोतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पद्मावती हिरो ज्ञानमाता हायस्कूल समोर दिल्ली नाका संगमनेर येथे संपर्क साधावा अथवा 9607909742 किंवा 9579524040 या क्रमांकावर फोन करावा.

Visits: 212 Today: 2 Total: 1983750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *