प्रा.फटांगरे यांना पीएच.डी पदवी प्रदान

प्रा.फटांगरे यांना पीएच.डी पदवी प्रदान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथील प्रा.नामदेव फटांगरे यांना शारीरिक शिक्षण विषयातील शोध प्रबंधास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.


प्रा.फटांगरे यांना जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शारीरिक शिक्षण या विषयात ‘जळगाव विद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये खेळांच्या सोयीसुविधा, आयोजन-नियोजन, शारिरीक शिक्षण विभागाचे कामकाज आणि या सर्वांचा खेळाडूंच्या कामगिरीवर होणार्‍या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास’ या शोधप्रबंधासाठी नुकतीच डॉक्टरेट अर्थात पीएच.डी. ही पदवी बहाल केली आहे. त्यांना श्री सद्गुरू एज्युकेशन संस्थेचे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन- जळगाव येथील प्राचार्य डॉ.नारायण खडके यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या प्रा.फटांगरे हे पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्ही.आय.आय.टी.) या कोंढवा येथील स्वायत्त महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 2070144

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *