राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीचे संपूर्ण श्रेय अकोलेकरांना ः कोते

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेकरांच्या प्रेमाने भारावून गेलो असून त्यांच्या प्रेरणेनेच समाजसेवा करू शकलो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान झाला. तसेच राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या रेड स्वस्तिक सोसायटीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड झाली, याचे श्रेय अकोलेकरांना असल्याचे प्रतिपादन श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी केले.

रेड स्वस्तिक सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश कोते यांची निवड झाल्याबद्दल अकोलेकरांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सरपंच संदीप शेटे, अभिनव शिक्षण संस्थेचे खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्यामकांत शेटे, माजी उपसरपंच तथा नगरसेवक विजय सारडा, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, पत्रकार श्रीनिवास रेणुकादास, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, प्रमोद मंडलिक, परशराम शेळके, अनिल शेटे, अनिल नाईकवाडी, रोहिदास जाधव, सागर शेटे, शारदा महाविद्यालयाचे प्रा.वर्मा, प्रा.सोनवणे, डॉ.शहा, संदेश चष्मा घरच्या संचालिका अर्चना देशमुख, सुचित्रा पोखरकर, आशिष सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभार नगरसेवक सचिन शेटे यांनी मानले.
