जिल्ह्याच्या सरासरीत झाली घट, मात्र संगमनेर तालुक्यातील चिंता वाढत्याच! जिल्ह्यातील सर्वाधीक सक्रीय रुग्ण संगमनेरात; पठारभागातील संक्रमणही अद्याप टिकून..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची सर्वाधीक गती असलेल्या संगमनेर तालुक्याची स्थिती अद्यापही चिंताजनक असून आजही तालुक्यातून जवळपास दोनशे रुग्ण समोर आले आहेत. नागरिकांच्या हलगर्जीपणातून परतलेल्या कोविड संक्रमणाने तालुक्याच्या पठारभागालाही अद्याप पूर्णतः सावरण्याची संधी दिलेली नाही. आजही संगमनेर तालुक्यातून जिल्ह्यात सर्वाधीक रुग्ण आढळले असून सक्रीय रुग्णांची संख्याही हजाराच्या पार स्थिरावली आहे. आजच्या अहवालातून शहरातील 27 जणांसह 194 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या आता 28 हजार 623 झाली आहे. शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 422 जणांचा कोविडने बळीही घेतला आहे.
गेल्या महिन्याभरापासून एकीकडे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची रुग्णसंख्या कमी-अधिक होत असतांना अपवाद वगळता संगमनेर तालुका वधारलेलाच आहे. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत तालुक्यातील रुग्णवाढीचा सरासरी वेग 115 रुग्ण प्रतिदिवस होता, नंतर दहा दिवसांत तो 146.3 व शेवटच्या दहा दिवसांत 146.6 वर जावून पोहोचला. त्यामुळे चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्ण समोर येणार्या तालुक्यांमध्ये संगमनेर पहिल्या क्रमांकावर अक्षरशः खिळून आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यात प्रशासकीय यंत्रणेचा कामचुकारपणा यामुळे तालुक्याची अवस्था आजही बिघडलेली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होत असतांना मोजक्या तालुक्यांमधील असंतुलीत रुग्णसंख्या संशय निर्माण करणारी ठरत आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त 93, खासगी प्रयोगशाळेचे 51 व रॅपीड अँटीजेनच्या 53 अशा तालुक्यातील 197 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील सह्याद्री विद्यालय परिसरातील 51 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 78 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 39 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, घोडेकर मह्यातील 88 व 45 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 70, 62 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 55, 46, 45 वर्षीय दोघे व 44 वर्षीय इसम, 42, 32 वर्षीय दोघे व 20 वर्षीय तरुण, 15 वर्षीय मुलगा, 73, 66, 60, 39 व 35 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणीचा त्यात समावेश आहे.
तालुक्याच्या पठारभागातील 18 गावांमधून आज 42 रुग्ण समोर आले असून त्यात नांदूर खंदरमाळ येथील 84 वर्षीय वयोवृद्ध इसम, कोठे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, कालेवाडीतील 52 वर्षीय महिला, वरवंडी येथील 27 वर्षीय महिला, दरेवाडीतील 80, 50 व 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय इसम व 28 वर्षीय तरुण, येलखोप येथील 35 वर्षीय तरुण, 27 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगा व तीन वर्षीय बालिका, हिरेवाडीतील 22 वर्षीय तरुण, साकूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुण व 17 वर्षीय मुलगी,
शेंडेवाडीतील 29 वर्षीय तरुण, कौठे मलकापूर येथील 30 वर्षीय महिला, रणखांब येथील 50 व 45 वर्षीय इसमांसह 20 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, बिरेवाडीतील 48 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, 31 व 21 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तीन तरुणी व बारा वर्षीय मुलगी, खांबे येथील 55 वर्षीय इसमासह 52 वर्षीय महिला, जवळे बाळेश्वर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव माथा येथील 96 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 86 वर्षीय महिला, खरशिंदे येथील 25 वर्षीय तरुण, मांडवे येथील 32 वर्षीय तरुणासह 27 वर्षीय महिला, अशा एकूण 42 जणांना कोविडची लागण झाली आहे.
तालुक्याच्या अन्य ग्रामीणभागातील चिकणी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 व 33 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 42 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 31 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 31 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा, निमगाव जाळी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 45 वर्षीय इसम, 27 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 84 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 48 वर्षीय महिला, काकडवाडीतील 36 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30, 28 व 25 वर्षीय तरुण,
चिखली येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52, 49 व 48 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 37 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 80, 27 व 25 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 51 वर्षीय इसम, ओझर येथील 70 वर्षीय दोन, 43 व 40 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन व 45 वर्षीय इसम, 35, 26, 24, 22 व 20 वर्षीय दोन तरुण, 16 वर्षीय मुलगी व आठ वर्षीय मुलगा, मिर्झापूर येथील 50 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, राजापूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मनोली येथील 13 वर्षीय मुलगा व 10 वर्षीय मुलगी,
रुले येथील 43 वर्षीय इसम, निळवंडे येथील 75 वर्षीय महिला, कौठे कमहेश्वर येथील 30 वर्षीय तरुण, बडझरी येथील 52 व 45 वर्षीय इसमांसह 40 वर्षीय तरुण, समनापूर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय महिला, चंदनापूरीतील 46 वर्षीय इसम, खळी येथील 40 वर्षीय महिला, सायखिंडीतील 74 वर्षीय महिला, पिंपरी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, जवळे कडलग येथील 72 व 70 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 65 व 44 वर्षीय महिलांसह 24 व 23 वर्षीय तरुण,
तळेगाव दिघे येथील 24 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 15 वर्षीय मुलगा आश्वी बु. येथील 56 वर्षीय इसम, चिंचपूर येथील 55 व 50 वर्षीय महिला, निमज येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 25 वर्षीय तरुण, पोखरी हवेलीतील 49 वर्षीय महिला, मेंंंंंंंंंंंढवण येथील 48 वर्षीय महिलेसह 32व 20 वर्षीय तरुण, 17 वर्षीय मुलगी, खराडी येथील 54 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 40 वर्षीय तरुण, मालदाड येथील 39 वर्षीय तरुणासह 11 वर्षीय मुलगा, रायते येथील 56 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 56 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 व 45 वर्षीय इसम,
वडगाव लांडगा येथील 46 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 39 वर्षीय तरुण, रहिमपूर 29 वर्षीय तरुण, पांगरी येथील 34 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 35 व 32 वर्षीय महिला, कनोली येथील 21 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 28 वर्षीय महिलेसह 10 वर्षीय मुलगा व नऊ वर्षीय मुलगी, पारेगाव येथील 65 वर्षीय दोन व 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 35 व 30 वर्षीय तरुण, 36, 30 व 26 वर्षीय महिला आणि सात वर्षीय मुलगा, जाखुरी येथील 26 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगा, खांडगाव येथील 66 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 व 48 वर्षीय महिला, 41, 32, 28, 27 व 20 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 58 वर्षीय महिलेसह 53 वर्षीय इसम व 10 वर्षीय मुलीचा यात समावेश आहे. घुलेवाडी येथील 53 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 29 वर्षीय तरुण व कोकणगाव येथील 31 वर्षीय महिलेचे नाव दुबार नोंदविले गेले आहे.
जिल्ह्यात आज 887 रुग्ण!
जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज 887 रुग्णांची नव्याने भर पडली. आजच्या अहवालातून संगमनेर 197, श्रीगोंदा 111, पारनेर 93, पाथर्डी 74, अकोले 62, कर्जत 57, शेवगाव 56, नगर ग्रमाीण 44, अहमदनगर महापालिका क्षेत्र 40, राहुरी 36, जामखेड 34, नेवासा 26, श्रीरामपूर 21, राहाता 15, इतर जिल्ह्यातील नऊ, कोपरगाव व भिंगार लष्करी परिसर प्रत्येकी सहा अशा रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 22 हजार 633 झाली आहे.