राहुरीमध्ये अज्ञात तरुणाची मुळा नदीपात्रात आत्महत्या

राहुरीमध्ये अज्ञात तरुणाची मुळा नदीपात्रात आत्महत्या
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातून जाणार्‍या नगर-मनमाड महामार्गावर असणार्‍या मुळा नदीवरील पुलावरुन एका अज्ञात तरुणाने नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.21) घडली आहे.


सदर घटनेची माहिती समजताच राहुरी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. साधारण 35 ते 40 वयोगटातील तरुणाने अंगातील कपडे काढून नदीपात्रात उडी घेतली. त्यावेळी त्याच्याजवळील बॅग आणि चप्पल पुलावरच काढून ठेवली. सुमारे पन्नास फूट अंतरापर्यंत तो गटांगळ्या खात जाताना दिसला. त्यापुढे तो नदीपात्रात दिसेनासा झाला असल्याचे माहिती जुन्या पुलाजवळ पोहत असलेल्या काही तरुणांनी दिली. दरम्यान, नवघाट परिसरात त्याचा शोध घेतला. त्यानंतर गणपती घाट परिसरातही शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या तरुणाचा शोध घेऊनही त्याचा तपास लागला नाही.

Visits: 164 Today: 1 Total: 2112814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *