संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमण आटोक्यात येईना! सरासरीत झाली धक्कादायक वाढ; आजही तालुक्यातील तिघांचा कोविडने घेतला बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

उताराला लागलेल्या संक्रमणाला प्रशासन आणि नागरिकांनी पुन्हा चढावर आणल्याने त्याचे दुष्परिणाम आता संगमनेर तालुका दररोज भोगू लागला असून समोर येणारी मोठी रुग्णसंख्या जिल्ह्याची अवस्था बिघडवणारी ठरत आहे. एकीकडे पारनेरसह अन्य तालुक्यातील संक्रमणात मोठी घट झाल्याचा दिलासा मिळू पाहत असतांना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र त्याला अडसर ठरत आहे. त्यामुळे अपवाद वगळता दररोज तीन आकडी रुग्णसंख्या समोर येणारा संगमनेर तालुका जिल्ह्यात उच्चांकी रुग्णसंख्येचा डोंगर उभा करणारा ठरला आहे. आजही शहरातील तेरा जणांसह तालुक्यातील तब्बल 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 27 हजार 777 झाली आहे. तर कोविडने आजही तालुक्यातील तिघांचा बळी घेतला असून आत्तापर्यंत तालुक्यातील 421 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील 1 हजार 55 जणांवर उपचार सुरू आहेत.

    

गेल्या महिन्याभरापासून संगमनेर तालुक्याची रोजची रुग्णसंख्या उंचावलेलीच असून एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतांना दुसरीकडे संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत मात्र दररोज वाढ होत आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 दिवसांत जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 13 ऑगस्टच्या 1 हजार 155 रुग्णांचा अपवाद वगळता रुग्णसंख्या तीन आकड्यातच आहे. मात्र त्याचवेळी मागील 25 पैकी केवळ पाच दिवस वगळता संगमनेर तालुक्यातून रोजच तीन आकडी रुग्ण आढळत आहेत. मागील पाच दिवसांत सरासरी 138 रुग्ण दररोज या गतीने तालुक्यात 828 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या मागील पाच दिवसांतील जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या 21 टक्के इतकी आहे. यावरुन संगमनेर तालुका आणि जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील प्रादुर्भाव याचा सहज अंदाज बांधता येतो.

     आजही तालुक्याची रुग्णसंख्या जिल्ह्यात अव्वलस्थानी असून शहरातील तेरा, पठारभागातील 38 व तालुक्यातील इतर गावांतील 96 अशा एकूण 147 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच आज तालुक्यातील तिघांचा कोविडने बळी घेतल्याने तालुक्यातील मृतांची संख्याही आता 421 वर पोहोचली आहे. आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये डॉ.आंबेडकर स्मारक परिसरातील 41 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुणी, मालदाड रोडवरील 63 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, 15 व 11 वर्षीय मुले, लखमीपूरा भागातील 46 वर्षीय इसम, नवीन नगर रस्त्यावरील 19 वर्षीय तरुणी, इंदिरानगर मधील 46 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 27 व 26 वर्षीय तरुण,

     मांडवे बु. येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 व 40 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरुण, 22 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 41, 22 व 21 वर्षीय तरुण, 35 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, सावरगाव तळ येथील 55 वर्षीय इसम, घारगाव येथील 71, 54 व 25 वर्षीय महिलांसह 31 व 20 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 50 वर्षीय महिला, 44 वर्षीय इसम, 15 वर्षीय मुलगा, वरवंडीतील 55 वर्षीय इसम, कनोली येथील 65 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण,

     संगमनेर खुर्द येथील 41 वर्षीय तरुण, करुले येथील 50 वर्षीय इसम, पारेगाव बु. येथील 53, 45 व 35 वर्षीय महिला, 32 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथील 49 वर्षीय इसम, सायखिंडीतील 85 वर्षीय दोघा वयोवृद्धांसह 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 60, 50, 45 व 28 वर्षीय महिला, 55 वर्षीय इसम, 21 वर्षीय तरुण, औरंगपूर येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 49 व 47 वर्षीय इसम, 47 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 71 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 65 वर्षीय दोन, 50, 38 व 25 वर्षीय महिला, 42, 38 व 36 वर्षीय तरुण, 15 व 8 वर्षीय मुले व चार वर्षीय मुलगी,

     नांदूर येथील 34 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 35 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी, वनकुटे येथील 45 वर्षीय महिला, राजापूर येथील 81 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 55 वर्षीय इसम व 35 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 78 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 63 वर्षीय महिला, 55 वर्षीय इसम व 40 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथभल 15 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा, कौठे मलकापूर येथील 42 व 18 वर्षीय तरुण, 

 चंदनापुरी येथील 34 वर्षीय तरुणासह 31 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 54 व 52 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, एठेवाडी येथील 42 वर्षीय तरुणासह 32, 30 व 29 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 45 वर्षीय महिलेसह 42 व 40 वर्षीय तरुण, खळी येथील 16 वर्षीय मुलगा, शेडगाव येथील 57 वर्षीय इसम, ओझर खुर्द येथील 42 वर्षीय तरुणासह दहा वर्षीय मुलगा, उंबरी बाळापूर येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, डिग्रस येथील 26 वर्षीय तरुण, पानोडी येथील 20 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 25 वर्षीय तरुण व 13 वर्षीय मुलगा, मेंढवन येथील 35 वर्षीय तरुण,

कोकणगाव येथील 28 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 70 व 45 वर्षीय महिलांसह 30 व 28 वर्षीय तरुण, कोंची येथील 67 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगी व दहा वर्षीय मुलगा, पेमगिरी येथील 56 व 48 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, रणखांब येथील 43 वर्षीय इसम, साकूर येथील 45 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 25 वर्षीय तरुण, खरशिंदे येथील 70 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, चिखली येथील 49 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालक, निळवंडे येथील 39 वर्षीय तरुण,

निमगाव पागा येथील 50 वर्षीय महिला, मनोली येथील 36 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, देवगाव येथील 43 वर्षीय इसम, प्रतापपूर येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 71 व 32 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 35 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 65 वर्षीय महिला, चिखली येथील 33 व 21 वर्षीय तरुण 17 वर्षीय मुलगा, जोर्वे येथील 70 वर्षीय जेष्ठ नागरिक आणि झरेकाठी येथील 60 वर्षीय महिला अशा तालुक्यातील एकूण 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 27 हजार 777 झाली आहे. त्यासोबत आज तालुक्यातील तिघांचा कोविडने मृत्यूही झाल्याने शासकीय नोंदीनुसार तालुक्यातील कोविड बळींची संख्या आता 421 वर पोहोचली आहे. सध्या तालुक्यातील 1 हजार 55 रुग्णांवर विविध रुग्णालयांत व कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. संगमनेर बरोबरच गेल्या काही दिवसात अकोले तालुक्यातील रुग्णसंख्याही वाढत असल्याने त्याचा ताण संगमनेरातील आरोग्य यंत्रणांंवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 116573

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *