पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर ‘सेवा सप्ताह’
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर ‘सेवा सप्ताह’
नायक वृत्तसेवा, शिर्डी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून यानिमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.
उत्तर नगर जिल्ह्यात आमदार राधाकृष्ण विखे, भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह कालावधीमध्ये प्रत्येक मंडलात 70 दिव्यांग बांधवांना विविध वस्तूंचे वाटप, रुग्णांना फळे वाटप, कोरोनाबधितांना प्लाझ्मा दान करण्यात येणार असून, युवा मोर्चाच्यावतीने 70 ठिकाणी रक्तदान शिबीर, प्रत्येक बुथवर 70 वृक्ष लागवड, यासह पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अभियानासाठी जिल्हा संयोजक म्हणून नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे. तर अकोले, संगमनेर, राहाता निरीक्षक म्हणून जालिंदर वाकचौरे व श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासासाठी सुनील वाणी यांची नियुक्ती केली आहे. मंडल प्रभारी म्हणून अकोले सुधाकर गुंजाळ, संगमनेर ग्रामीण काशिनाथ पावसे, संगमनेर शहर भाऊसाहेब वाकचौरे, राहाता शरद थोरात, कोपरगाव ग्रामीण नितीन कापसे, कोपरगाव शहर अशोक पवार, श्रीरामपूर ग्रामीण सोनाली नाईकवाडी, श्रीरामपूर शहर सचिन देसरडा, नेवासा मीना राठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.