… तर वकिलांना 15 हजार रुपये मानधन द्या; नेवासा वकील संघाची मागणी
… तर वकिलांना 15 हजार रुपये मानधन द्या; नेवासा वकील संघाची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
न्यायालयीन कामकाज बंद ठेवायचे असेल तर वकिलांना 15 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी नेवासा वकील संघाने नुकतीच वकील संघाचे अध्यक्ष अॅड.वसंत नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले. याचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. न्यायालयीन कामकाज सुरू करण्यात यावे अशी मागणी करत जर न्यायालयीन कामकाज बंद ठेवायचे असेल तर वकिलांना 15 हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी नेवासा वकील संघाने निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन देतेवेळी वकील संघाचे बन्सी सातपुते, रमेश पाठे, ज्ञानदेव जाधव, कल्याण पिसाळ, अरुण झिने, प्रशांत माकोणे, वैभव वाकचौरे, संभाजी काळे, भारत चव्हाण हे सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.