ऑक्टोबर ठरतोय संगमनेरकरांसाठी दिलासादायक! रुग्णसंख्येत घसरणीची श्रृंखला आजही कायम; जिल्ह्यातील सर्व तालुके सत्तरच्या आंत..


नायक वृत्तसेवा,
गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या उताराला लागली असून मागील तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने कमी होणारी एकूण रुग्णसंख्या आज अवघ्या 57 रुग्णांवर येवून पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या दीर्घकाळापासून रुग्णसंख्येचे उच्चांक अनुभवणार्‍या संगमनेर तालुक्यासाठी ऑक्टोबर महिना दिलासादायक ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत असून नागरिकांनी संक्रमण कायम असल्याचे भान ठेवून हलगर्जीपणा टाळल्यास रुग्णसंख्येत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांनी खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांबाबतही शंका उपस्थित केली होती, त्यानंतर लागलीच आज तालुक्यातील रुग्णसंख्या साठीत आल्याने आश्‍चर्यही व्यक्त होत आहे. आज शहरातील सहा जणांसह तालुक्यातील 57 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 244 झाली आहे.


गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व तालुक्यांमधील कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असतांना संगमनेरसह पारनेर, राहाता व श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येबाबत जणू स्पर्धा लागल्याची चिंताजनक स्थिती दिसत होती. त्यातच दररोज तीन आकडी रुग्ण समोर येणार्‍या संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांच्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होणारी संख्या नगण्य असल्याने व रोजच्या एकूण अहवालात खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांचाच अधिक भरणा असल्याने काहीसा संशय निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले शुक्रवारी तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता स्थानिक पत्रकारांनी सदरची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता याबाबत काही तक्रारी समजल्या असल्याचे सांगत जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍यांना चौकशीच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर लागलीच आज तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या एकदम कमी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होवू लागले आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेकडून तालुक्यातील एकही अहवाल प्राप्त झाला नाही. खासगी प्रयोगशाळेचे 49 आणि रॅपीड अँटीजेनच्या अवघ्या आठ अहवालांतून तालुक्यातील 57 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात संगमनेर शहरातील जनता नगरमधील 34 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नवीन नगर रोडवरील 22 वर्षीय तरुणी, मालदाड रोडवरील 31 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 43 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 37 वर्षीय महिलेचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.


तालुक्याच्या ग्रामीणभागातील 38 वाड्या व वस्त्यांमधून आज 51 रुग्ण आढळले असून त्यातील 27 गावांमधून प्रत्येकी अवघा एकच रुग्ण समोर आला आहे. दोनपेक्षा अधिक रुग्ण समोर येणार्‍या गावांची संख्याही आज अवघी दोन आहे. आजच्या अहवालातून वडगाव पान येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय महिला, चिखलीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम व 35 वर्षीय तरुण, जांभुळवाडीतील 51 व 34 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, कणकापूर येथील 48 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, कोळवाडा येथील 55 वर्षीय इसम,


महालवाडी येथील आठ वर्षीय बालिका, मंगळापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 22 वर्षीय तरुण, मानोरी येथील 75 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 83 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, पारेगाव येथील 30 वर्षीय महिला, पावबाकी येथील 55 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, पिंपरी लौकी येथील 30 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 20 वर्षीय तरुणी, राजापूर येथील 35 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 52 व 43 वर्षीय महिला, रायते येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कालेवाडीतील सहा वर्षीय मुलगा, सावरगाव तळ येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडझरी बु. येथील नऊ वर्षीय मुलगा, घारगाव येथील 16 वर्षीय मुलगा, खंडेरायवाडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 70 वर्षीय महिला,


मालुंजे येथील 70 व 60 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 18 वर्षीय तरुणी, वडगाव लांडगा येथील 56 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 30 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 23 वर्षीय महिला, सोनेवाडी येथील 32 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 72 वर्षीय महिला, तांगडी (आंबी खालसा) येथील 86 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, बिरेवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर येथील 99 व 60 वर्षीय महिला, पानोडी येथील 14 वर्षीय मुलगी, कनोली येथील 24 वर्षीय महिला व धांदरफळ खुर्द येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा ग्रामीणभागातील 51 जणांसह तालुक्यातील एकूण 57 जणांना कोविडची लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 244 झाली आहे.

गांधी जयंतीच्या दिनी जिल्ह्याला मिळाला मोठा दिलासा..
मागील मोठ्या कालावधीपासून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाचशे ते आठशेच्या दरम्यान स्थिरावलेली असतांना जिल्ह्यातील काही तालुक्यातील संक्रमण मात्र भरातच होते. आज गांधी जयंतीच्या दिनी त्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले असून आज जिल्ह्यात सर्वाधीक 66 रुग्ण श्रीगोंदा तालुक्यात आढळले. मागील मोठ्या कालावधीपासून तीन आकडी संख्येत रुग्ण समोर येणार्‍या संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्याही आज मो÷या प्रमाणात खालावून 57 वर पोहोचली. पारनेर 50, शेवगाव 49, राहाता 44, अहमदनगर महापालिका क्षेत्र 36, श्रीरामपूर 27, राहुरी 24, कर्जत व कोपरागव प्रत्येकी 23, पाथर्डी व नेवासा प्रत्येकी 22, अकोले 21, नगर तालुका 18, इतर जिल्ह्यातील 14, जामखेड आठ व लष्करी रुग्णालयातील एका जणांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 46 हजार 637 झाली आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 79475

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *