महिन्याभरानंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या सहाशेच्या घरात! संगमनेर तालुका मात्र उंचावलेलाच; आजही आढळले जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्ण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चढाला लागलेल्या कोविड संक्रमणाने अहमदनगर जिल्हावासीयांना आज काहीसा दिलासा देतांना तब्बल महिन्याभरानंतर रुग्णसंख्या सहाशेच्या खाली आणली आहे. एकीकडे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या खालावल्याचे समाधान असतांना दुसरीकडे संगमनेरसह राहाता, शेवगाव, अकोले, कोपरगाव व कर्जत तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र वाढली आहे. जिल्ह्यात संगमनेरातून सर्वाधीक गतीने रुग्ण समोर येत असून तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीचा वेग 124 रुग्ण दररोज इतका आहे. आजही तालुक्यातून 122 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील सहा, पठारभागातील 32 आणि अन्य तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 26 हजार 598 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

मागील महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जिल्हा कोविड संक्रमणातून सावरत असल्याचे चित्र निर्माण होताहोता अचानक जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यातील रुग्णसंख्या चढाला लागली. त्यात प्रामुख्याने संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव व कर्जत तालुक्यात सरासरी रुग्णगती वाढल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आणि जिल्ह्याच्या दररोजच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडाही जवळपास दुपटीने वाढला. त्यामुळे 625 रुग्ण दररोज सरासरी असलेला जिल्हा चालू महिन्यात थेट 820 रुग्ण गतीवर तर संगमनेर तालुका सरासरी दररोज 74 रुग्णांच्या गतीवरुन थेट 124 रुग्णांवर गेल्याने गेल्या वीस दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवून जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले.

आज शासकीय प्रयोगशाळेचे दहा, खासगी प्रयोगशाळेचे 95 आणि रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून समोर आलेल्या 122 अहवालातून तालुक्यातील 119 जणांसह अन्य तालुक्यातील तिघांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील 33 वर्षीय तरुणासह संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 84 वर्षीय वयावृद्ध नागरिकासह 45 वर्षीय इसम, 43 व 33 वर्षीय तरुण व दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. यासोबतच तालुक्याच्या पठारभागातील येठेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 39 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 17 वर्षीय तरुणी, कालेवाडीतील 27 वर्षीय तरुण,

जांबुत बु. येथील 60 व 30 वर्षीय महिलेसह 58 वर्षीय इसम, 32 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगा, घारगाव येथील 60 वर्षीय महिला, 46 वर्षीय इमस, 21 वर्षीय तरुण व 12 वर्षीय मुलगी, दरेवाडी येथील 71 वर्षीय महिला, हिरेवाडीतील 45 वर्षीय इसम, शेंडेवाडीतील 33 वर्षीय तरुण, खंडेरायवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मांडवे बु. येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला, 31 व 30 वर्षीय तरुण, साकूर येथील 63 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण, रणखांबवाडी येथील 51 वर्षीय इसम, जवळे बाळेश्‍वर येथील 45 वर्षीय महिला, पोखरी बाळेश्‍वर येथील 13 वर्षीय मुलगा, बोटा येथील 25 वर्षीय महिलेसह नऊ वर्षीय बालिका, नांदूर येथील 38 वर्षीय महिला व कोठे येथील 42 वर्षीय तरुण,

तालुक्याच्या अन्य भागातील चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्‍वी बु. येथील 23 व 19 वर्षीय तरुण, चिकणी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 49 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 65 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 85 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, निळवंडे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव टेंभी येथील 50 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हंगेवाडीतील 26 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 53 वर्षीय इसम, निमज येथील 63 वर्षीय महिला,

मनोली येथील 45 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 71, 59 व 24 वर्षीय महिलांसह 58 वर्षीय इसम व 20 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 60 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 32 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 44 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण, राजापूर येथील 32 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथील 35 वर्षीय महिला, पेमगिरीतील 65 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 55 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगा, मिर्झापूर येथील 37 वर्षीय तरुण, लोहारे येथील 30 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, वडझरी बु. येथील 37 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, वडझरी खुर्द येथील 52 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 27 वर्षीय तरुण,

काकडवाडीतील 19 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 69 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तळेगाव दिघे येथील 76 व 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 65 वर्षीय महिला, 40 व 30 वर्षीय तरुण व 23 वर्षीय तरुणी, वाघापूर येथील 22 वर्षीय तरुणी, घुलेवाडीतील 81, 60 व 40 वर्षीय महिलांसह 30 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, सायखिंडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 42 व 37 वर्षीय महिला, 40 व 29 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलगा, पोखरी हवेली येथील 71, 60 व 37 वर्षीय महिला, चिखली येथील 40 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 57 वर्षीय इसमासह 51, 39 व 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय दोन तरुण व 13 वर्षीय मुलगा, धांदरफळ येथील 55 व 33 वर्षीय महिलांसह 38 वर्षीय तरुण आणि शेडगाव येथील 45 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला. तसेच कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 34 वर्षीय तरुण व 28 वर्षीय महिलेचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्याची रुग्णसंख्या महिन्याभरानंतर सहाशेच्या घरात..
गेल्या 20 जुलैनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज सहाशेच्या आंत आली. सोमवारच्या तुलनेत आज पारनेर (-68), श्रीगोंदा (-52), जामखेड (-40), पाथर्डी (-27), अहमदनगर महापालिका क्षेत्र (-25) यासह नेवासा (-21) व नगर ग्रामीण (-14) या आठ तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावली. तर राहाता (+26), संगमनेर (+19), शेवगाव (+19), कोपरगाव (+15), अकोले (+16) व कर्जत (+11) या तालुक्यांची रुग्णसंख्या वाढली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 43, खासगी प्रयोगशाळेचे 340 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून 185 असे एकूण जिल्ह्यातील 568 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर 122, शेवगाव 64, अकोले52, कर्जत 50, नगर ग्रामीण 44, पारनेर 38, पाथर्डी 37, राहाता 36, राहुरी 24, कोपरगाव 22, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 16, नेवासा 15, अहमदनगर महापालिका क्षेत्र 11, इतर जिल्ह्यातील नऊ, जामखेड सहा व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

Visits: 30 Today: 1 Total: 117901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *