डॉ. चंदनमल बाफनांची राष्ट्रीय कार्यकारिणीपदी निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जैन संघटनेचे ब्रँड अॅम्बेसेडर तसेच संगमनेरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. चंदनमल बाफना यांची त्यांच्या विविध कार्यक्षेत्रात व समाजसेवा क्षेत्रात केलेल्या कामाची पावती म्हणून श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपदी बिनविरोध निवड करून सन्मानित केले.

गेल्या 45-46 वर्षांपासून स्वमालकीचे बाफना ड्रग हाऊस या मेडिकल क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची सेवा केली. कोरोना संकटात कामगार व गोरगरिबांसाठी तन-मन-धनाने 24 तास सेवा दिली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, संस्कार, पर्यावरण, बँकिंग, वृक्षमित्र परिवार, क्रीडा, व्यापार, वैद्यकीय, शाकाहार, गोरक्षण, नैसर्गिक आपदा इत्यादी राष्ट्र व राज्यात विविध क्षेत्रात त्यांचा नेहमीच योगदान व सहयोग असतोच. आज देखील ते जवळपास 40 पेक्षा अधिक छोट्या-मोठ्या संस्थांवर कार्य करत आहे. त्यांना आजपर्यंत 200 पेक्षा अधिक पुरस्कार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र (प्रशस्तीपत्र) मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांवर ते काम करत आहे. मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करतात. त्यांना मिळालेल्या या पदाबद्दल त्यांचे कुटुंबात, समाजात व इतरत्र कौतुक होत आहे.
