नदीत आढळलेल्या मायलेकरांच्या मृतदेह प्रकरणाचा लागडा छडा शेवगाव पोलिसांत दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

नायक वृत्तसेवा, शेवगाव
सोमवारी सकाळी (ता. 9) मायलेकरांचे मृतदेह नदीत आढळून होते. दरम्यान, या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अखेर या प्रकरणाचा छडा आता लागला असून या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.

ठाकूर पिंपळगाव येथील शेवगाव-गेवराई रस्त्यावरील भागीरथी नदीच्या पुलाखालील सिमेंटच्या पाईपमध्ये ज्योती अंबादास सोनवणे व दीपक अंबादास सोनवणे या मायलेकरांचे मृतदेह सोमवारी (ता. 9) सापडले होते. मृत महिलेच्या मुलीने दिलेल्या माहितीवरून मृत ज्योती सोनवणे व दीपक सोनवणे हे सुवर्णा अशोक घोरपडे या महिलेसह रविवारी (ता. 8) दुपारी घरामधून बाहेर गेले होते. सायंकाळी अंबादास सोनवणे एकटेच घरी आले. मायलेकरांचा शोध घेऊनही ते सापडल्याने अंबादास सोनवणे याने पत्नी व मुलगा हरवल्याची खबर बोधेगाव पोलीस चौकीत दिली. तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे दोन दिवसांपूर्वी नदीत मृतावस्थेत सापडलेल्या माय-लेकरांच्या मृत्यू प्रकरणी मृत महिलेच्या पतीस बिडकीन (ता. पैठण) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत महिलेची आई चंद्रकला नवनाथ जगदाळे (रा. सुकळी खुर्द, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून अंबादास अशोक सोनवणे (वय 40) व सुवर्णा अशोक घोरपडे (वय 35, दोघेही रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी मायलेकरांचे मृतदेह नदीत आढळून आले. दरम्यान, अंबादास सोनवणे रविवारपासून गायब झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत महिलेची आई चंद्रकला जगदाळे यांच्या फिर्यादीनुसार अंबादास सोनवणे व सुवर्णा घोरपडे या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सोनवणे यास पोलिसांनी बिडकीन येथून ताब्यात घेतले आहे.

Visits: 12 Today: 2 Total: 113021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *