श्रीरामपूरमध्ये दशक्रिया घाटावर काँग्रेसची ‘गांधीगिरी’ ओटा व परिसर स्वच्छ करत पालिकेचे वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील दहाव्याचा ओट्याजवळ मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस समितीच्यावतीने बुधवारी (ता. 11) दहाव्याचा ओटा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत ‘गांधीगिरी’ करण्यात आली.

दहाव्याच्या ओट्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तेथे मुंडन केल्यानंतरचे केस, वाढलेले गवत, विधी केल्यानंतरचे मडके, प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळ्या व कचरा साचलेला आहे. यामुळे दहाव्याचा विधी करताना सर्वसामान्य नागरिकांना मोठी अडचण होत आहे. ‘सुंदर व स्वच्छ श्रीरामपूर’ अशी पोकळ वल्गना करणार्या नगरपालिका सत्ताधार्यांनी या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

यावेळी करण ससाणे म्हणाले, पालिका सत्ताधार्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण नाही. दहावा ओटा परिसरात पालिकेचे लक्ष नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दहावा विधी करताना मोठी अडचण निर्माण होते. नगरपालिकेने वेळोवेळी हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असेही ससाणे म्हणाले. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे म्हणाले, दहाव्याचा विधी नगराध्यक्षांना मान्य नसेल तरीही, त्यांनी त्यांचे जे काही विचार आहेत ते इतर नागरिकांवर लादण्याचे प्रयत्न करू नये. या कारणामुळेच दहाव्याचा ओटा दुर्लक्षित आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे म्हणाले, दहावा ओट्याच्या या दुरवस्थेमुळे दहाव्याच्या विधीसाठी बाहेरगावाहून येणार्या नातेवाईकांच्या, अत्यंत वाईट प्रतिक्रिया येत आहेत.

या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, नगरसेवक मुज्जफर शेख, रितेश रोटे, शशांक रासकर, मनोज लबडे, सुहास परदेशी, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, आशिष धनवटे, प्रदीप कुर्हाडे, जावेद शेख, प्रवीण नवले, रियाज पठाण, सरबजीतसिंग चुग, संतोष परदेशी, रावसाहेब अल्हाट, रणजीत जामकर, मुन्ना परदेशी, नीलेश भालेराव, मंगलसिंग साळुंके, राहुल शिंपी, रितेश एडके, अतुल वढणे, अमोल शेटे, वैभव पंडित, सनी मंडलिक, श्री. बोर्डे, कृष्णा पुंड, विशाल साळवे, योगेश गायकवाड, राजेश जोंधळे, सुरेश ठुबे, अजय धाकतोडे, संजय साळवे आदी उपस्थित होते.
