संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या आजही वाढलेलीच! तालुका पोहोचला सहव्वीस हजारांच्या उंबरठ्यावर; रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात वाढलेले कोविड संक्रमण अजूनही भरातच असून आजही जवळपास शंभर जणांना कोविडची लागण झाली आहे. तालुक्याच्या पठारभागात वाढलेले संक्रमणात काही प्रमाणात खाली आले असून साकूर गटातील रुग्णसंख्येतही दिलासादायक घट झाली आहे. आज तालुक्यातील 98 जणांना कोविडची लागण झाल्याचे अहवाल मिळाले असून त्यात ग्रामीणभागातील पन्नास वाड्या-वस्त्या मिळून 87 जणांसह शहरातील दहा व अन्य तालुक्यातील एकाचा त्यात समावेश आहे. आजच्या एकूण अहवालात पठारभागातील 31 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 25 हजार 958 रुग्णसंख्येवर पोहोचला असून 715 रुग्ण सक्रीय आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा वेग आता वाढला असून सरासरी 96.85 टक्के दराने रुग्ण बरे होवून घरी जात आहेत.


गेल्या पंधरवड्यात संपूर्ण तालुक्यात व विशेष करुन तालुक्याच्या पठारभागात धुमाकूळ घालणार्‍या कोविडने तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढवण्यासह प्रशासनाच्याही चिंता वाढवल्या आहेत. त्यामुळे साकूर आणि आश्‍वी गटात जनसहभागातून लॉकडॉनचा प्रयोगही करण्यात आला असून त्यातून समाधानकारक चित्र समोर येत असल्याचे प्राप्त अहवालातून स्पष्ट होत आहे. लॉकडाऊनचा प्रयोग झालेल्या या दोन्ही गटातील उंचावलेली रुग्णसंख्या आता बर्‍याच प्रमाणात खालावली असून नागरिकांनी कोविडचे अस्तित्त्व मान्य करुन नियमांचे पालन केल्यास परिस्थिती पूर्वपदावर येण्याचीही शक्यता आहे.


जिल्ह्यात पहिल्या क्रमांची रुग्णसंख्या असलेल्या संगमनेर तालुक्यात आज 98 जणांना संक्रमण झाले. त्यात शहरातील इंदिरानगर येथील 33 वर्षीय महिला, शिवाजी नगर येथील 56 वर्षीय महिला, देवी गल्लीतील 52 व 47 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 57 वर्षीय इसमासह 52 व 27 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम व 36 वर्षीय महिला संक्रमित झाले आहेत. याशिवाय पठारभागातील रणखांब येथील 44 वर्षीय इसम, साकूर येथील 55 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, 40 व 35 वर्षीय महिला, मांडवे येथील 80, 70 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 60, 40 व 29 वर्षीय महिला,


आंबी दुमाला येथील 35 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 50 व 25 वर्षीय महिलांसह 42 व 27 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 35 वर्षीय तरुणासह 15 वर्षीय मुलगा, दरेवाडीतील 50 वर्षीय इसम, हिरेवाडीतील 47 वर्षीय इसम, कुरकुटवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण, खांबे येथील 35 वर्षीय तरुण, घारगाव येथील 35 वर्षीय तरुण, एठेवाडीतील 35 वर्षीय तरुणासह 23 वर्षीय तरुणी, पिंपळगाव देपा येथील 60 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, नांदूर येथील 65 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम व जांबूत येथील दोन वर्षीय बालक.


तालुक्याच्या ग्रामीणभागातील अन्य गावांमधून सांगवी येथील 56 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 27 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 33 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 70 वर्षीय महिला, खळी येथील 39 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 55 वर्षीय इसम, ओझर येथील 20 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 55 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 23 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 55 व 26 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, 16 वर्षीय मुलगा व तीन वर्षीय बालक, कासारा दुमाला येथील 54 वर्षीय इसम, राजापूर येथील 40 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 50 व 45 वर्षीय महिलांसह 31 वर्षीय तरुण व पाच वर्षीय मुलगी, शेडगाव येथील 11 वर्षीय मुलगी,


पानोडी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व 54 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 65 वर्षीय महिलेसह 58 वर्षीय इसम, वडझरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 व 38 वर्षीय तरुण व 40 वर्षीय महिला, झोळे येथील 27 वर्षीय तरुण, आनंदवाडीतील 38 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 30 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 41 वर्षीय महिला, पोखरी हवेली येथील 38 वर्षीय तरुणासह 15 वर्षीय मुलगी, आश्‍वी खुर्द येथील 40 वर्षीय तरुण, निमोण येथील 16 वर्षीय मुलगा, सायखिंडीतील 36 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 55 वर्षीय इसमासह 19 वर्षीय तरुण,


निमज येथील 48 वर्षीय इसम, मालुंजे येथील 20 वर्षीय तरुण, मालदाड येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा येथील 36, 25 व 22 वर्षीय तरुणांसह 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 30 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 60 व 34 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 33 व 29 वर्षीय तरुण व निमागव जाळीतील 40 वर्षीय महिला. तसेच अन्य तालुक्यातील सारोळा कासार येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण 98 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून तालुका आता 25 हजार 958 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 915 रुग्ण सक्रीय असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 96.85 टक्के आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 79922

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *