रक्षाबंधनानिमित्त डाक विभागाची खास योजना

नायक वृत्तसेवा, नगर
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजर्‍या होणार्‍या रक्षाबंधन सणानिमित्त यंदा डाक विभागाने खास योजना आणली आहे. त्यासाठी विशेष पाकिटाची व्यवस्था केली असून हे पाकिट अत्यंत आकर्षक, टिकाऊ आणि वॉटरप्रूफ असून अत्यंत सुरक्षितरित्या राखी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डाक विभागाच्या वरीष्ठ अधीक्षकांनी दिली आहे.

अहमदनगर विभागातील सर्व डाकघरांमध्ये या पाकिटांचा पुरेसा पुरवठा केला असून त्यामार्फत नागरिकांना राखी पाठविता येणार आहे. 22 ऑगस्टला रक्षाबंधन असून, त्यापूर्वी राखी पोहोचविण्यासाठी डाक विभागाने ही विशेष योजना आखली आहे. राखी अचूक पत्यावर वेळेत पोहोच करण्यासाठी पाकिटावर पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड आणि संपर्कक्रमांक लिहावा. याशिवाय स्पीड पोस्टाने देखील राखी पाठविता येणार आहे. परंतु, नाणी अथवा रोख पैसे पाठवू नये. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डाक विभागाने केले आहे.

Visits: 99 Today: 1 Total: 1114011

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *