जयहिंद महिला मंचने सैनिकांसाठी राख्या पाठविल्या! आजी-माजी सैनिकांनाही राखी बांधून केले रक्षाबंधन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऊन, वारा, पाऊस अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय सीमेवर दिवस-रात्र सेवा करणार्‍या सैनिकांप्रती आदर व्यक्त करत जयहिंद महिला मंचच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 2500 राख्या पाठविण्यात आल्या असून तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचे राखी बांधून रक्षाबंधन करण्यात आले.

संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज्य कल्याण सैनिक समितीच्यावतीने रक्षाबंधन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, दर्शन चौधरी, प्रकाश कोटकर, रावसाहेब कोटकर, राजेंद्र दिघे, भानुदास पोखरकर, प्रशांत चिखले, राजेंद्र वर्पे, सुनील थोरात, विक्रम थोरात, राजेंद्र पाचपिंड, प्रकाश लामखडे, संजय रहाणे हे आजी-माजी सैनिक यांसह पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोटे, सुनीता कांदळकर आदी उपस्थित होत्या.

याप्रसंगी पश्चिम बंगाल येथील बिनागुढी येथे 500 राख्या, जम्मू काश्मीर येथे 1000 हजार राख्या, पुणे येथे 500 तर राजस्थानमध्ये 500 राख्या सध्या सेना दलात कार्यरत असणार्‍या सैनिकांकडे त्या विभागातील यूनिटकरिता पाठविण्यात आल्या. भारतीय जवानांचा प्रत्येक भारतीयाला सदैव अभिमान राहिला आहे. ऊन, वारा, पाऊस अशा कठीण प्रसंगातही सैनिक रात्रंदिवस सीमेवर पहारा करत असतात. त्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो. कोणताही सण असो ते आपल्या कुटुंबियांसमवेत नसतात. या भावनेतून जयहिंद महिला मंचच्यावतीने मागील पाच वर्षांपासून दिवाळीकरिता फराळ पाठवणी करण्यात येते. तसेच रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करत राख्याही पाठवल्या जातात हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून भारत देश व सैनिकांप्रती प्रत्येकाने सदैव अभिमान बाळगावा, असे आवाहन यानिमित्ताने आमदार डॉ. तांबे यांनी केले.

सदर उपक्रमासाठी जयहिंद महिला मंचच्या ज्योती अभंग, स्मितल अभंग, दीपाली वर्पे, सुवर्ण कोटकर, शालन गुंजाळ, पुष्पा कोल्हे, सुषमा भालेराव, वैशाली पाचपिंड, प्रतिभा गडाख आदी भगिनींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समन्वयक प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर जयहिंद महिला मंचच्या सचिव सुनीता कांदळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Visits: 10 Today: 1 Total: 116856

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *