संगमनेर तालुक्याच्या कोविड संक्रमणात झाली पुन्हा वाढ! आजही तालुक्यातील एकाचा बळी; पठारभागात आढळले एकूण संख्येतील निम्मे रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणार्‍या तालुक्यात आघाडीवर असलेल्या संगमनेर तालुक्याला शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आजच्या अहवालातून पुन्हा धक्का बसला आहे. आज जिल्ह्यातील पारनेर, शेवगावसह संगमनेर तालुक्याने पुन्हा शंभरी ओलांडली असून शहरातील अकरा, पठारभागातील 45 जणांसह 106 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज रुग्णसंख्येत मोठी भर पडून तालुका आता 25 हजार 561 रुग्णसंख्येवर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्याही आता 861 झाली आहे. तालुक्यातील एकासह आज जिल्ह्यातील तेरा जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील तिघांसह राहाता तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.  जिल्ह्यातही आज संगमनेरसह पाच तालुक्यांची रुग्णसंख्या वाढली असून तीन तालुक्यातील रुग्ण काही प्रमाणात घटले आहेत.

     मागील महिन्याच्या 28 तारखेपासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याची रुग्णगती चढाला लागली आहे. कोविडचे दुसरे संक्रमण ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र उभे राहत असतांनाच शिथील झालेल्या नियमांचा गैरफायदा घेत तालुक्याच्या पठारभागासह काही ठिकाणी मोठ्या संख्येच्या उपस्थितीत धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पडले. या कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली झाल्याने त्याचा परिणाम परतत असलेले संक्रमण वाढण्यात झाली आणि त्याचा मोठा फटका संपूर्ण तालुक्याला बसला. आजही तालुक्याच्या अन्य ग्रामीण क्षेत्रातून 48 तर पठारभागातून 45 रुग्ण समोर आले आहेत.

     आज शासकीय प्रयोगशाळेचे 10, खासगी प्रयोगशाळेचे 70 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून समोर आलेल्या 106 अहवालांमधून संगमनेर शहरातील मालदाड रोड स्थित आशीर्वाद कॉलनीतून 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातून 60, 28 व 23 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 52 वर्षीय इसमासह 40, 32 व 30 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ग्रामीणभागातील जवळे कडलग येथील 48 व 45 वर्षीय इसमांसह 39, 34 व 32 वर्षीय तरुण, 13 वर्षीय मुलगा व 11 वर्षीय मुलगी, हिवरगाव पावसा येथील 19 वर्षीय तरुणी, कौठे धांदरफळ येथील 50 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 66 वर्षीय महिला व 26 वर्षीय तरुण,

     पिंपरी लौकी येथील 45 वर्षीय इसमासह 17 वर्षीय मुलगा, आश्‍वी खुर्द येथील 29 वर्षीय तरुण, कणकापूर येथील 50 वर्षीय दोन व 34 वर्षीय महिला, लोहारे येथील 45 वर्षीय इसम, सोनेवाडीतील 58 वर्षीय महिला व 55 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 30 वर्षीय महिला, चिकणी येथील 30 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 51 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 27 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 60 वर्षीय महिलेसह 46 वर्षीय इसम व 28 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 50 व 45 वर्षीय इसमांसह 42 व 32 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, वडझरी बु. येथील 17 वर्षीय मुलगी, पिंपळगाव कोंझिरा येथील 42 वर्षीय तरुणासह 40 व 30 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 38 वर्षीय तरुण,

     सावरचोळ येथील 24 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 42 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 70 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील  83 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 38 वर्षीय महिला, ओझर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम व 46 वर्षीय महिला, कातळवेढा येथील 45 वर्षीय महिलेसह 32 व 23 वर्षीय तरुण, खांबे येथील 19 वर्षीय तरुण, कुंभारवाडीतील 85 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, रणखांब येथील 25 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 85 वर्षीय महिला, साकूर येथील 65 व 42 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम, शिंदोडी येथील 48 वर्षीय इसम, शेळकेवाडीतील 36 वर्षीय तरुण, मांडवे येथील 65 व 32 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुण, जांभुळवाडीतील 18 वर्षीय तरुण, बोरबन येथील 39 वर्षीय तरुण, म्हसवंडी येथील 40 वर्षीय तरुण,

     जांबुत येथील 45 व 32 वर्षीय महिलांसह 35 व 32 वर्षीय तरुण, हिवरगाव पठार येथील 49 वर्षीय इसम, हिरेवाडीतील 22 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी पठारावरील 36 वर्षीय तरुण, घारगाव येथील 35 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय इसम व 35 वर्षीय महिला, चिंचेवाडीतील 60 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, वरवंडीतील 50 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 38 वर्षीय तरुणासह 34 वर्षीय महिला, आभाळवाडीतील 40 वर्षीय महिला व नांदूर खंदरमाळ येथील 76,5 व 33 वर्षीय महिला, 55 वर्षीय इसम, 32 वर्षीय तरुण, 13 व 9 वर्षीय मुली व सात वर्षीय मुलगा संक्रमतिम झाले आहेत. याशिवाय अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 42 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुणाचाही संगमनेरच्या बाधितांमध्ये समावेश आहे. 

आज जिल्ह्यात 1 हजार 47 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले तर 846 बाधितांची नव्याने भर पडली.  जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 92 हजार 924 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 96.03 टक्के आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत 846 रुग्णांची भर पडल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 5 हजार 804 झाली आहे.

शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून बाधीत आढळून आलेल्या रुग्णांंमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 13, जामखेड 13, कर्जत 01, नगर ग्रामीण 23, पारनेर 74, पाथर्डी 20, राहाता 01, राहुरी 01, संगमनेर 20, श्रीगोंदा 24 आणि इतर जिल्ह्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून बाधित आढळून आलेल्या रुग्णांंमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 23, अकोले 10, जामखेड 01, कर्जत 24, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 40, नेवासा 08, पारनेर 07, पाथर्डी 02, राहाता 12,  राहुरी 23, संगमनेर 70, शेवगाव 82, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 16 आणि इतर जिल्ह्यातील चार, अँटीजेन चाचणीत आढळलेल्या 320 रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र 03, अकोले 28, जामखेड 08, कर्जत 43, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 14, नेवासा 32, पारनेर 51, पाथर्डी 06, राहाता 17, राहुरी 17, संगमनेर 26, शेवगाव 38, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 11 आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज उपचार पूर्ण करुन घरी परतणाऱ्या रुग्णांमध्ये  अहमदनगर महापालिका क्षेत्र 22, अकोले 56, जामखेड 91, कर्जत 125, कोपरगाव 31, नगर ग्रामीण 53, नेवासा ३८, पारनेर 137, पाथर्डी 38, राहता 35, राहुरी 36, संगमनेर 153,  शेवगाव 132, श्रीगोंदा 49, श्रीरामपूर 32, लष्करी परिसर दोन व इतर जिल्ह्यातील 17 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचारांती बरे  झालेल्या रुग्णांची संख्या आता 2 लाख 92 हजार 925 झाली असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 804 आहे. आज संगमनेरातील एकासह जिल्ह्यातील तेरा जणांचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या आता 6 हजार 297 झाली आहे. आजच्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्याही आता 3 लाख 5 हजार 25 झाली आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 117725

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *