नेवाशाच्या महसूल नायब तहसीलदारपदी गायकवाड
नेवाशाच्या महसूल नायब तहसीलदारपदी गायकवाड
नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या अनेक महिन्यांपासून नेवासा तहसील कार्यालयातील रिक्त असलेल्या महसूल नायब तहसीलदारपदी नेवाशाचे सुपुत्र राजेंद्र गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेंद्र गायकवाड यांना महसूल विभागाच्या सर्व विभागांचा अनुभव असून त्यांनी यापूर्वी मंडल अधिकारी, अव्वल कारकून, जेलर, तसेच पुरवठा अधिकारी आणि नांदगाव येथे नायब तहसीलदार अशा विविध पदांवर काम पाहिले आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा नक्कीच येणार्या काळात नेवासा महसूल विभागाला होणार आहे अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, माजी नायब तहसीलदार प्रदीप पाठक, बापूसाहेब देवढे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड तसेच महसूल विभागाच्या विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.