ग्रामीणभागातील रुग्णगतीने घेतली काहीशी उसळी..! शहराला दिलासा मिळण्याचे सत्र कायम, मात्र ग्रामीणभागाने चिंता वाढवली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दोन दिवस शहरासह ग्रामीण रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र दिसल्यानंतर मंगळवारी ग्रामीण रुग्णसंख्येने पुन्हा काहीशी उसळी घेतली. शनिवार, रविवार आणि त्यात दसरा यामुळे कोविड चाचण्या करणार्‍या सर्वच घटकांनी दीर्घकाळानंतर सुट्टी घेतल्याने मागील दोन दिवसांत समोर येणारी रुग्णसंख्या खालावली होती. मात्र मंगळवारी खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या अहवालातून तालुक्याच्या रुग्णगतीची सरासरी पुन्हा पूर्वगतीवर आली असून मंगळवारी शहरातील चौघांसह जणांसह एकुण 40 रुग्ण समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 157 झाली आहे.


सप्टेंबरमध्ये दिड हजारांहून अधिक रुग्णांची भर घालणार्‍या कोविडचा ऑक्टोबर सुरु होताच काहीसा वेग मंदावला. चालू महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांचा विचार करता गेल्या महिन्यातील दररोज 52 रुग्ण वाढण्याचा वेग कमी होवून तो 47.3 रुग्ण प्रति दिवसावर खाली आला होता. त्यातही शहरी संक्रमणात अगदी सुरुवातीपासूनच घट नोंदविली गेल्याने पहिल्या दहा दिवसांत शहरात सरासरी 9.4 गतीने केवळ 94 रुग्ण, तर ग्रामीणभागात 37.9 च्या गतीने तब्बल 379 रुग्णांची भर पडली.

नंतरच्या दहा दिवसांत तालुक्याच्या रुग्णवाढीचा वेग बराच कमी होवून तो 26.5 झाल्याने 11 ते 20 ऑक्टोबरदरम्यान तालुक्यातील रुग्णसंख्येत 265 रुग्णांची भर पडली. यात शहरातील 64 तर ग्रामीण भागातील 201 रुग्णांचा समावेश होता. नंतरच्या सात दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्या आणखी कमी होवून 24.57 रुग्ण दररोज या वेगाने 172 जणांची भर पडली. यातही शहरात दररोज तीन रुग्ण तर ग्रामीण भागात दररोज 21 रुग्ण समोर आले. 1 ते 27 ऑक्टोबर या कालावधीचा विचार करता या सत्ताविस दिवसांत तालुक्यातून सरासरी 33.70 वेगाने एकूण 910 रुग्ण समोर आले. यात शहरीभागातून अवघ्या 6.66 वेगाने 180 तर ग्रामीण क्षेत्रात सरासरी 27 वेगाने तब्बल 730 रुग्णांना संक्रमण झाल्याचे समोर आले. हा सिलसिला अजूनही सुरुच असून मंगळवारी शहरीभागाच्या तुलनेत ग्रामीणभागातील संक्रमणाची गती अधिक असल्याचे दिसून आले.


मंगळवारी (ता.27) रात्री उशीराने रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे 34 तर खासगी प्रयोगशाळेचे सहा असे एकूण 40 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून शहरातील शिवाजीनगर परिसरातील 38 वर्षीय तरुण, साईनगरमधील 36 वर्षीय महिला व मालदाड रस्त्यावरील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिलेला कोविडची लागण झाली. मंगळवारी तालुक्याच्या ग्रामीणभागातील रुग्णगतीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. तब्बल पंधरा दिवसांनंतर तालुक्यात पुन्हा चाळीस रुग्ण समोर आले. यापूर्वी 13 ऑक्टोबररोजी 42 रुग्ण समोर आले होते, त्यात शहरी 14 तर ग्रामीण 28 जणांचा समावेश होता.

मंगळवारच्या अहवालातून तालुक्यातील जोर्वे, घुलेवाडी, निमोण, गुंजाळवाडी, आश्‍वी बु. व खांडगावमधून तीनपेक्षा अधिक रुग्ण समोर आले. खांडगावमधील 80 वर्षीय वयोवृद्धासह 30 वर्षीय तरुण, 75 व 55 वर्षीय महिला, आश्‍वी बु. मधील 45, 42 व 16 वर्षीय महिलांसह 36 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय तरुण, 55, 37 व 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील 40 वर्षीय दोघा तरुणांसह शिवारातील बटवालमळा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व गोल्डन सिटीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,

घुलेवाडी येथील 52, 46, 28 व 25 वर्षीय इसमांसह 44 वर्षीय महिला, समनापूर येथील 55 वर्षीय महिलेसह 37 व 35 वर्षीय तरुण, निमोण येथील 40 वर्षीय तिघा महिलांसह 21 वर्षीय तरुण, हंगेवाडी येथील 40 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 45 वर्षीय तरुण, राजापूर येथील 24 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 39 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 35 वर्षीय महिला व पिंपळगाव कोंझिरा येथील 72 वर्षीय ज्येष्ठाला कोविडचे संक्रमण झाले आहे. मंगळवारच्या अहवालातूनही शहरी रुग्णसंख्येतील घट कायम राहीली, मात्र ग्रामीण भागातील रुग्णगतीत काहिशी वाढ झाल्याचे दिसून आले. मोठ्या कालावधीनंतर तालुक्याच्या रुग्णसंख्येत चाळीस रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या आता 4 हजार 157 वर पोहोचली आहे.

अकोल्यातील रुग्णगतीतही झाली घट..
संगमनेर पाठोपाठ अकोले तालुक्यातील रुग्णगतीतही गेल्या काही दिवसांपासून घट नोंदविली गेली आहे. त्यामुळे अकोलेकरांमध्येही काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी तालुक्यातील सहा जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. यात शहरातील एका व्यापार्‍याचा समावेश आहे.

प्रशासनाने मंगळवारी शहर व तालुक्यातील 44 जणांच्या रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा स्राव चाचण्या केल्या. त्यातून अवघ्या 9 टक्के वेगाने चार जणांच्या तर खासगी प्रयोगशाळेकडून दोघांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत सहा जणांची भर पडून एकुण रुग्णसंख्या 2 हजार 186 झाली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालातून ब्राम्हणवाडा येथील 35 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महीला, समशेरपुर शिवारातील (नागवाडी) येथील 30 वर्षीय महीला, कोतुळ मधील 25 व 23 वर्षीय तरुण व शहरातील बाजारपेठेतून 35 वर्षीय तरुण व्यापार्‍याचा अहवाल संक्रमित असल्याचा मिळाला आहे.

जिल्ह्यातील सद्यस्थिती..
जिल्ह्यातील 290 रुग्णांना मंगळवारी उपचारांती घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 945 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता सरासरी 95.65 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 221 बाधितांची नव्याने पडल्याने सध्या उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या वाढून ती आता 1 हजार 557 झाली आहे.

शासकीय प्रयोगशाळेने केलेल्या स्राव चाचणीतून 36, खाजगी प्रयोगशाळेच्या चाचणीतून 24 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 161 अशा एकूण 221 रुग्णांची मंगळवारी नव्याने भर पडली.
शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 11, कर्जत तालुक्यातील 02, नगर ग्रामीण मधून 04, पारनेर तालुक्यातून 04, पाथर्डी तालुक्यातून 11 व श्रीगोंदा तालुक्यातून 04 रुग्ण निष्पन्न झाले. खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 12, जामखेड तालुक्यातील 02, नगर ग्रामीण मधील 05, राहाता तालुक्यातील 01, राहुरीतील 01, संगमनेर तालुक्यातील 06 व श्रीरामपूर तालुक्यातील एकाला संक्रमण झाल्याचे समोर आले.

तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 14, अकोले तालुक्यातून 06, जामखेड तालुक्यातून 12, कर्जत तालुक्यातून 14, कोपरगाव तालुक्यातील 08, नगर ग्रामीण मधील 04, नेवासा तालुक्यातील 05, पारनेर तालुक्यातील 18, पाथर्डी तालुक्यातील 02, राहाता तालुक्यातील 07, राहुरी तालुक्यातील 01, संगमनेर तालुक्यातील 34, शेवगाव तालुक्यातील 09, श्रीगोंदा तालुक्यातील 25 व श्रीरामपूर तालुक्यातील तिघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

मंगळवारी उपचारांती घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 46, अकोले 21, जामखेड 10, कर्जत 13, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 27, नेवासा 05, पारनेर 17, पाथर्डी 37, राहाता 17, राहुरी 11, संगमनेर 19, शेवगाव 07, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 17, लष्करी परिसरातील 07 आणि लष्करी रुग्णालयातील 16 रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्याचा धावता आलेख..
    उपचारानंतर बरे झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या : 52 हजार 945..
    जिल्ह्यातील विविध ठिकाणी सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 1 हजार 557..
    जिल्ह्यात आजवर कोविडने घेतलेल्या बळींची एकूण संख्या : 848..
    जिल्ह्यातील आजवरची एकूण रुग्णसंख्या : 55 हजार 350..
    जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण : 95.65 टक्के..
    मंगळवारी जिल्ह्यातील 290 रुग्णांना डिस्चार्ज तर 221 बाधितांची नव्याने पडली भर..

Visits: 103 Today: 1 Total: 1114080

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *