महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्यातून पाच कोटींचा निधी! संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण होणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विधीमंडळ गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. कोरोना संकटातही तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखताना नामदार थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्याने तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण यांसह इतर कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात म्हणाले, मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकटात शासनातून निधी मिळवणे अवघड असतानाही नामदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विकासकामांना कायम प्राधान्य दिले आहे. वाडी-वस्तीवर विकासाची घोडदौड कायम राखताना 2515 योजनेंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.

या अंतर्गत चिंचोली गुरव येथील माधव वस्ती, सोनवणे रस्ता, वडझरी खुर्द येथील खालचा मळा रस्ता, तळेगाव दिघे बाळ पाटलाचीवाडी रस्ता, पळसखेडे कांडेकर वस्ती रस्ता, कर्‍हे, चिकणी पाटी ते मोठेबाबा मंदिर, वडझरी खुर्द, तिगाव, माळेगाव हवेली, मालुंजे, धांदरफळ बुद्रुक, वेल्हाळे, जाखुरी, पिंपरणे शीवरस्ता, राजापूर, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, मेंढवण, हिवरगाव पावसा, नान्नज दुमाला, निमज, वडगाव पान, डोळासणे, पिंपळे, कासारा दुमाला, पानोडी, मालदाड, पिंपरणे, निळवंडे, निमगाव बुद्रुक, कवठे मलकापूर या गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच निमगाव टेंभी येथील स्मशानभूमी तर खरशिंदे येथील कब्रस्तान बांधणे, निमगाव बुद्रुक व आश्वी बुद्रुक येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे, अंभोरे येथील दशक्रिया विधी घाट बांधणे व सुशोभीकरण, पारेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय, जवळेकडलग येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत यांसह विविध कामांचा समावेश आहे.

या सर्व विकासकामांसह उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या निळवंडे कालव्यांच्या कामाची गती राखताना 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा होत आहे. नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकारी संस्था अत्यंत कार्यक्षमपणे काम करत असून या सहकारी संस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तसेच नव्याने होणार्‍या रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणामुळे मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117515

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *