चणेगाव आणि परिसरात वटवृक्षांचे रोपण! गीतांजली आसावा सह महिलांचा पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी वटपौर्णिमेच्या दिवशी चणेगाव आणि परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. यासाठी गीतांजली आसावा आणि परिसरातील महिलांनी पुढाकार घेत वृक्षाचे रोपण करून त्याच्या पुढील संवर्धनाची जबाबदारी स्विकारली.

संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानांतर्गत वटपौर्णिमेचे औचित्य साधत प्रत्येक वाडी, वस्ती व गावात वटवृक्षाची पुजा व रोपण करण्यात आले.भारतीय संस्कृतीमध्ये सत्व, श्रद्धा, आणि पतीपरायणतेचे प्रतीक असलेल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा सण साजरा झाला. याच वेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी तालुक्यातील महिलांनी घेऊन आदर्श निर्माण केला आहे.थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेले दंडकारण्य अभियान, पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनली असल्याचे प्रतिपादन गितांजली आसावा यांनी यावेळी केले.चणेगाव,झरेकाठी,दाढ खुर्द,खळी,पिंप्री,लौकी अजमपुर,शिबलापुर,आश्वी खुर्द,शेडगाव,हंगेवाडी या गावात आयोजित वटपौर्णिमा निमित्ताने वटवृक्ष पुजा,व रोपण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल ऊगलमुगले, नंदा वाणी सह स्थानिक महिला सहभागी झाल्या होत्या.

Visits: 124 Today: 1 Total: 1115794
