वनकुटे येथे विवाहितेचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वनकुटे येथे विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (ता.14) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता.15) घारगाव पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, वनकुटे येथील विवाहित महिला तिच्या शेतात काम करत असताना येथील सोमनाथ संता कडाळे हा शेजारील शेतात काम करत होता. त्याचवेळी त्याने पीडित महिलेस खडा मारुन, शिट्ट्या मारु लागला. त्यानंतर वाईट गाणे गावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी सोमनाथ कडाळे याच्याविरोधात पोलिसांनी गुरनं.174/2021 भादंवि कलम 354, ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. राजू खेडकर हे करत आहे.
