संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे तिसरे सहस्रक! शहरातील 13 जणांंसह आत्ताही आढळले तब्बल 86 रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

शुक्रवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालातून आज सकाळी 72 रुग्ण समोर आलेले असतानाच आत्ता शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून संगमनेर शहरातील तेरा जणांसह 86 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अवघ्या चोवीस तासातच तालुक्याच्या रूग्णसंख्येत तब्बल 158 रुग्णांची भर पडून तालुक्याने बाधितांचे तिसरे सहस्रक ओलांडीत 3 हजार 42 रुग्णसंख्या गाठली आहे.

प्रशासनाच्यावतीने सध्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. सद्यस्थितीत लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने अशा रुग्णांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याची सुरुवात आपल्या विभागांंपासून करून रुग्ण शोधण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यातूनच अन्य जणांसह तालुक्यातील पोलीस पाटलांसह पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचीही स्राव चाचणी घेण्यात आली. यासोबतच खासगी व शासकीय प्रयोगशाळेकडून काही जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातून तालुक्याच्या रूग्ण संख्येत 86 जणांची भर पडली आहे. 

आजच्या अहवालातून शिवाजीनगर परिसरातील 26 वर्षीय तरुण, साई नगर मधील 65 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 45 वर्षीय महिला व 23 आणि 21 वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातील 38 वर्षीय महिला, नवीन नगर रोडवरील 16 वर्षीय तरुण, गोविंदनगर परिसरातील 70 वर्षीय इसम, संगमनगर परिसरातील 53, 44 वर्षीय महिलांसह 48 व 26 वर्षीय तरुण पॉझिटिव असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील राजापूर येथील 50 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 47 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 45, 20, 16 वर्षीय तरुण, वाडीतील 65, 45 वर्षीय महिलांसह 48, 50 वर्षीय इसम, अकरा वर्षीय बालिका व 15 वर्षीय बालक,

वरवंडी येथील 53 वर्षे इसम, निमगाव बुद्रुक येथील पस्तीस वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 48 वर्षीय इसम, नांदुरी दुमाला येथील चाळीस वर्षीय तरुण, सांगली येथील 26, 18, 13 वर्षीय तरुणांसह 19 वर्षीय तरुणी, आंबी दुमाला येथील 52 वर्षीय इसम, कवठे बुद्रुक येथील 70, 42 व चाळीस वर्षीय महिलांसह 47, 45, 33 व 23 वर्षीय तरुण, नांदूर येथील तेहतीस वर्षीय तरुण, घारगाव मधील 34 व पंचवीस वर्षीय तरुणासह एक वर्षीय बालक, चंदनापुरी येथील 75 वर्षीय महिला, चिखली येथील 81 वर्षीय वयोवृद्धासह 75 वर्षीय महिला व 44 वर्षीय तरुण, राजापूर येथील 21 व 18 वर्षीय तरुण, चिंचपूर मधील 55, 34, 30 वर्षीय महिलांसह 37 वर्षीय तरुण, अकरा वर्षीय बालक, प्रतापपुर मधील 60 वर्षीय दोघांसह 35 वर्षीय महिला, सुकेवाडी येथील 48 वर्षीय व 24 वर्षीय तरुणांसह 40 वर्षीय महिला,

निमोण मधील 47 वर्षीय तरुण, देवकवठे मधील 49 वर्षीय इसम व 22 वर्षीय तरुण, तीगाव येथील 32 वर्षीय तरुण, तळेगाव मधील 10 वर्षीय बालक, निमगाव जाळी येथील 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील चाळीस वर्षीय महिला, चिखली मधील 44 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील अकरा वर्षीय बालक, कवठे बुद्रुक मधील साठ वर्षीय इसम, पळसखेड येथील 26 वर्षीय तरुण, सायखिंडी मधील 65 वर्षीय महिला, कनोली येथील 42 वर्षीय तरुण, पिंपरी मधील चाळीस वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा व 14 वर्षीय मुलगी आणि 54 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 65 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील तेहतीस वर्षीय तरुण, चिकणी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी खुर्द मधील 61 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 38 वर्षीय तरुण व रायतेवाडी येथील छत्तीस वर्षीय तरुणाचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आत्ताही 86 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे तिसरे सहस्रक ओलांडीत 3 हजार 42 बाधितसंख्या गाठली आहे.

स्थानिक प्रशासनाने रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून स्राव तपासणी वाढविल्याने रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर आले आहे. आजही दिवसभरात शासकीय कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्या त्या परिसरातील तब्बल 510 नागरिकांच्या स्राव तपासण्या करण्यात आल्या, त्यातून 86 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. यापुढेही अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने चाचण्या केल्या जाणार असल्याने दररोज रुग्ण संख्येतील वाढ दिसणार आहे. मात्र त्यामुळे घाबरून न जाता निर्भयपणे कोविडचा मुकाबला केल्यास या महाभारीचा अंत टप्प्यात असणार आहे.

Visits: 74 Today: 1 Total: 435583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *