संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा पुन्हा उद्रेक! पन्नास दिवसानंतर ओलांडली शंभरी; पठारभागातील प्रादुर्भावात चिंताजनक वाढ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पारनेर पाठोपाठ आज संगमनेर तालुक्यातही कोविडने उच्चांक गाठला असून तब्बल पन्नास दिवसानंतर रुग्णसंख्या शंभरीच्या पल्याड गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्याच्या पठारभागात दिवसागणिक संक्रमणाची गती वाढत असून आज तब्बल सतरा गावांमधून एकूण रुग्णसंख्येच्या निम्म्याहून अधिक म्हणजे 66 रुग्ण समोर आले आहे. त्यातही आंबी दुमाला, म्हसवंडी, साकूर व कालेवाडी परिसरातील प्रादुर्भावात चिंताजनक रुग्णवाढ झाल्याचे समोर आले आहे. आज तालुक्यातील 43 गावांमधून 113 रुग्ण आढळले असून त्यात शहरातील अवघ्या सहा जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुका आता 23 हजार 613 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
विवाह सोहळ्यांसह गर्दीच्या विविध कार्यक्रमांनी कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेला आमंत्रण धाडले होते. त्यातून परतलेल्या संक्रमणाने तालुक्याच्या सर्वच भागात अक्षरशः दैना उडवतांना 18 हजारांहून अधिक नागरिकांना झपाटले आणि त्यातील जवळपास साडेतिनशे जणांचा बळीही घेतला होता. संक्रमणाच्या दुसर्या लाटेने देशभरातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादाही स्पष्ट केल्याने तुटपूंज्या व्यवस्थेमूळे डोळ्यादेखत हजारों नागरिकांचे बळी गेल्याच्या घटना ताज्या असतांनाच आता पुन्हा त्याच त्या चुका घडत असल्याने ओसरत चाललेली कोविडची दुसरी लाट पुन्हा परतण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या विवाह सोहळ्यांचा कालावधी असल्याने ग्रामीणभागात आपल्या आनंदासाठी अथवा आपल्या श्रीमंतीच्या थाटाचे प्रदर्शन घडविण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करुन पुन्हा एकदा जंगी सोहळे आयोजित होत आहेत. त्याचा फटका परतलेले संक्रमण वाढण्यात होत असल्याचे आता स्पष्टपणे समोर येवू लागले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 14, खासगी प्रयोगशाळेचे 33 आणि रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतून 68 अशा एकूण 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात आंबी दुमाला येथील 65 वर्षीय रुग्णाचे नाव तिनवेळा नोंदविले गेले आहे. आजच्या अहवालातील धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यातील पठारभागात गेल्या काही दिवसांपासून संक्रमणात मोठी वाढ झाली असून आजतर तब्बल 17 गावांमधील 66 रुग्ण समोर आले आहेत. त्यात आंबी दुमाला येथील 13, म्हसवंडीतील आठ, साकूर व विरेवाडी परिसरातील आठ, कालेवाडी व अकलापूर परिसरातील अकरा अशा चाळीस रुग्णांचा त्यात समावेश आहे. आज तालुक्यात आढळलेल्या एकूण 113 रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील विद्यानगरमधील 57 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 63, 53 व 40 वर्षीय महिलेसह 35 व 32 वर्षीय तरुण संक्रमित झाले आहेत.
कोविडची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र दिसत असतांना तालुक्याच्या ग्रामीणभागात पुन्हा कोविडचा उद्रेक झाल्याचे दिसत असून आज तब्बल 43 गावांमधून रुग्ण समोर आले आहेत. त्यात आंबी दुमाला येथील 75, 65,7, 54, 37, 34 व 29 वर्षीय महिला, 85, 65 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 38 व 26 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 75 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 56 वर्षीय इसम, 40, 37, 34 व 27 वर्षीय तरुण आणि 30 वर्षीय महिला, अकलापूर येथील 35 व 23 वर्षीय महिलांसह 34 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 45 व 44 वर्षीय इसमांसह 43 वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथील 49 वर्षीय इसमासह 41 वर्षीय महिला, कुरकुंडी येथील 17 वर्षीय दोघा तरुणांसह तीन वर्षीय मुलगा, हिवरगाव पठार येथील 56 व 55 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम, नांदूर खंदरमाळ येथील 39 वर्षीय महिलेसह चौदा वर्षीय मुलगा,
माळेवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, म्हसवंडी येथील 80, 70 वर्षीय दोन व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 53 वर्षीय इसम, 40, 36 व 17 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 24 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगी, आंबी खालसा येथील 55 वर्षीय इसमासह 37 वर्षीय महिला, घारगाव येथील 65 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोठे बु. येथील 25 वर्षीय तरुण, साकूर येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 50 वर्षीय इसम, 60 व 29 वर्षीय महिला, कुरकुटवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38, 35 व 30 वर्षीय तरुण, 15 व नऊ वर्षीय मुले, पानोडी येथील 50 व 45 वर्षीय इसमांसह 30 वर्षीय महिला, राजापूर येथील 50 वर्षीय महिला, कोळवाडा येथील 75 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम व 23 वर्षीय तरुण, पिंपळगाव माथा येथील 50 व 36 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय तरुण व 21 वर्षीय तरुणी, मालदाड येथील 28 वर्षीय महिला,
कोकणगाव येथील 35 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 35 वर्षीय महिला, निमज येथील 75 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 32 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 65 व 60 वर्षीय महिलांसह 35 व 32 वर्षीय तरुण, कुरण येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 42 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 45 वर्षीय इसम, वरवंडी येथील 35 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 35 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 40 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 32 व 31 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 72 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण, निमगाव खुर्दमधील 31 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 24 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 49 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 48 वर्षीय महिला, रायते येथील 51 वर्षीय महिला, सोनोशी येथील 48 वर्षीय इसमासह 42 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 19 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आज केवळ संगमनेर तालुक्यातून शंभराहून अधिक रुग्ण आढळले. उर्वरीत तालुक्यातील रुग्णगती मात्र सरासरीला स्थिर राहील्याने व काही तालुक्यातील संक्रमणात घट नोंदविली गेल्याने मंगळवारच्या तुलनेत जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही आज जवळपास शंभर रुग्णांची घट झाली. आज शासकीय 74, खासगी 117 व रॅपीड अँटीजेनच्या 347 अशा एकूण 538 अहवालांमधून संगमनेर 113, पारनेर 78, पाथर्डी 71, श्रीगोंदा 54, कर्जत 39, अहमदनगर महापालिका क्षेत्र 27, अकोले व नगर ग्रामीण प्रत्येकी 25, शेवगाव 23, राहाता 17, जामखेड 16, नेवासा 12, कोपरगाव 11, राहुरी 10, इतर जिल्ह्यातील आठ, श्रीरामपूर पाच व भिंगार लष्करी परिसरातील दोघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 86 हजार 371 झाली असून गेल्या चौदा दिवसांत जिल्ह्यात 466 रुग्ण दररोज या सरासरीने 6 हजार 529 रुग्णांची भर पडली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पारनेर तालुका वगळता मुख्यालयासह जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील कोविडच्या संक्रमणाला ओहोटी लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र या दरम्यानच्या काळात पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व कर्जत या तालुक्यांमध्ये कोविड नियमांची पायमल्ली होवून विविाह सोहळ्यांना शेकड्यांमध्ये गर्दी झाल्याने दुसर्या आठवड्याने संक्रमणात पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या सात दिवसांत संगमनेर तालुक्यातून सरासरी 34 रुग्ण या गतीने 237 रुग्ण तर नंतरच्या सात दिवसांत सरासरी 57 रुग्ण या गतीने तब्बल 398 रुग्णांचरी भर पडली. दुसर्या आठवड्यात वाढलेल्या संक्रमणातून तालुक्यात कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निश्कर्षही समोर आला आहे.