राहुल गांधी विचार मंचच्या कार्याध्यक्षपदी थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक, अमृतधारा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब थोरात यांची राहुल गांधी विचार मंचच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.

संगमनेरातील यशोधन कार्यालय येथे कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते अण्णासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत कडलग, शेतकी संघाचे व्यवस्थापक अनिल थोरात, बी. आर. चकोर, सुनील नवले आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुरेश थोरात, बाबा ओहोळ, राम रोडे, प्रमोद हिरे, पी. वाय. दिघे, विक्रम थोरात, विठ्ठल काकड, संजय थोरात, सोपान कोल्हे, माणिक यादव, शिवाजी दिघे, दत्तात्रय काकड, रामनाथ इंगळे, विठ्ठल जाधव आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 98 Today: 1 Total: 1106770

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *