धांदरफळ बुद्रुकमध्ये एकास लोखंडी रॉडने मारहाण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे अवैध दारुविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना देतो म्हणून एकास लोखंडी रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. तसेच मित्राची दुचाकी फोडून मोठे नुकसान केल्याची घटना रविवारी (ता.6) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धांदरफळ बुद्रुक येथील परेश माधव मुळे यांच्या घरासमोर निमगाव पागा येथील मित्र भाऊसाहेब संपत कानवडे यांनी त्यांची प्लॅटिना दुचाकी (क्र.एमएच.17, सीएन.3551) ही उभी केली होती. त्याचवेळी अमेय माधव मुळे हा तेथे आला आणि त्याने दुचाकी फोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी परेश मुळे म्हणाले की, माझ्या मित्राची गाडी का फोडतोय. त्यावर अमेय मुळे म्हणाला ‘तु माझ्या दारु व्यवसायाची माहिती पोलिसांना का देतो, तुझा काटाच काढतो’ असे म्हणून लोखंडी रॉडने वार करुन जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुचाकीवरही वार करुन मोठे नुकसान केले. या प्रकरणी परेश मुळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अमेय मुळे याच्या विरोधात गुरनं.253/2021 भादंवि कलम 307, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी.आर.पवार हे करत आहे.

Visits: 233 Today: 1 Total: 2169958

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *