जवानांकडून साई सावली अनाथाश्रमात फळे वाटप
![]()
नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला संघटना संरक्षिकाच्यावतीने स्थानिक साई सावली अनाथाश्रमातील मुलांना नुकतेच फळे आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दलाच्या संरक्षिका अध्यक्षा वैशाली दहिवदकर म्हणाल्या, सामाजिक जबाबदारी पार पाडताना असे कार्यक्रम संरक्षिकाच्यावतीने नियमितपणे राबविले जातात. तुम्हांला कोणीही नाही असा विचार करू नका. तुम्ही देवाची अमूल्य भेट आहात. तसेच तुमच्याबरोबर संपूर्ण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल संरक्षिका कुटुंब आहे आणि आम्ही पुढेही सर्वांना सहकार्य करत राहू असा विश्वास दिला. मुलांना फळे व खाद्यपदार्थ मिळाल्याने सर्वजण आनंदित झाली होती. शेवटी साई सावली अनाथाश्रमाच्या अध्यक्षा उदमले यांनी संरक्षिका परिवाराचे आभार मानले. यावेळी उपकमांडर दिनेश दहिवदकर, संरक्षिका परिवारच्या सदस्या उपनिरीक्षक सुषमाकुमारी स्वामी, नीता शेळके, कामिनी चौधरी, नीता जाधव, रमा कुमारी, मीना पाल, राधा देवी, निमगावचे सरपंच आशिष कातोरे आणि जवान उपस्थित होते.
