राजूरमध्ये गुरुवारपासून आठ दिवस जनता संचारबंदी!

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या राजूरमध्ये गुरुवारपासून (ता.6) 13 मे पर्यंत आठ दिवसांची जनता संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ग्राम सुरक्षा समिती आणि स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविडचे संक्रमण वाढल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. राजूर परिसरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने ग्राम सुरक्षा समिती आणि स्थानिक प्रशासनाने बैठक घेत आठ दिवस जनता संचारबंदी घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून 13 मे पर्यंत जनता संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत संपूर्ण परिस्थितीवर पोलीस, ग्रामपंचायत, महसूल व आरोग्य विभाग रस्त्यावर थांबून परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. तत्पूर्वी एका व्यावसायिकाने दुकानात मागील बाजूने ग्राहकांना प्रवेश देऊन विक्री सुरू ठेवली होती; त्यास सरपंच गणपत देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी समज दिली. तर एका व्यावसायिकाने बाधित असतानाही दुचाकीवर प्रवास केल्याने त्याचेही कान उपटले. तसेच पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून, कडक कारवाई करत आहे. यामुळे कोरोनाखी साखळी तुटण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
