रेमडेसिविर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मिटके करणार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास सोपविला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मिटके हे विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उपअधीक्षक मिटके यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपविला आहे. जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी येथील पत्रकार दातीर खून प्रकरणाचा मिटके यांनी नुकताच छडा लावला होता. आता राज्यभर चचर्चेत आलेल्या खासदार डॉ.विखे यांच्या रेमडेसिविर खरेदी प्रकरणाचा तपासही मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
