जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात आजही उच्चांकी रुग्णवाढ! दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यासह जिल्ह्यातील प्रादुर्भावातही आज मोठी वाढ झाली आहे. दररोज वाढती रुग्णसंख्या समोर येत असल्याने राज्य सरकारने आजपासून नव्याने निर्बंध लागू केले असून त्याद्वारे रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यातूनही दिलासा न मिळाल्यास राज्याला पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’चा सामना करावा लागेल. आज राज्यासह जिल्ह्यात पुन्हा विक्रमी रुग्ण समोर आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यात 1 हजार 228 तर संगमनेर तालुक्यात 84 रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील 27 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 695 वर पोहोचली असून याच गतीने रुग्णवाढ सुरु राहील्यास रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणं अवघडं होईल. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 8 हजार 312 झाली आहे.
राज्यासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून वेगात कोविडचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे या पाचही तालुक्यातील आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्थितीत एकट्या संगमनेर तालुक्यात 695 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर निम्मे रुग्ण संस्थात्मक अथवा गृहविलगीकरणात आहेत. गृहविलगीकरणातील रुग्ण नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने राज्यातील रुग्णवाढ होत असल्याचेही निरिक्षण समोर आले असून संगमनेर तालुक्यातील चित्रही यापेक्षा वेगळे नाही.
सध्या शासकीय प्रयोशाळेवरील ताण वाचल्याने तेथून रुग्णांचे स्राव चाचणी अहवाल मिळण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी जात आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचे हे देखील एक कारण मानले जात आहे. त्यासोबतच सरकारी चाचण्यांना अद्यापही म्हणावा तसा वेग नसल्याने रुग्णसमोर येण्याचे प्रमाणही अजून कमी आहे, प्रत्यक्षात तालुक्यात रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. आजही शासकीय प्रयोगशाळेकडून संगमनेर तालुक्यातील एकही अहवाल प्राप्त झाला नाही. त्यातील अनेक संशयितांचे स्राव शुक्रवारी व शनिवारी घेतले गेले आहे. मात्र त्यांचे अहवालच प्राप्त नसल्याने त्यातील अनेकजण अजूनही आपण ‘कोविड मुक्त’ असल्यागत गावभर फिरत आहेत.
आज संगमनेर तालुक्यातील 81 व अन्य ठिकाणचे पाच असे एकूण 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यातील 67 अहवाल खासगी प्रयोगशाळेतून तर 17 अहवाल रॅपिड अँटीजेनद्वारा प्राप्त झाले आहेत. शहरातील 27 आणि ग्रामीण भागातील 52 अशा एकूण 79 रुग्णांची आज भर पडली आहे. त्यात शहरातील मालदाड रोडवरील 59 व 58 वर्षीय इसम, 56, 32 वर्षीय दोघी व 31 वर्षीय महिला, सुयोग सोसायटीतील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पार्श्वनाथ गल्लीतील 71 व 65 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 65 व 52 वर्षीय महिलांसह 58 वर्षीय इसम, भरीकर मळ्यातील 39 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 48 वर्षीय महिला, जनतानगरमधील 33 वर्षीय तरुण, जेधे कॉलनीतील 55 वर्षीय महिला,
कोल्हेवाडी रोडवरील 57 वर्षीय महिला, मेनरोडवरील 45 वर्षीय इसम, विद्यानगर येथील 51 वर्षीय इसम, नायकवाडपूरा येथील 56 वर्षीय महिला, जाणता राजा मैदानावरील 53 वर्षीय इसम, साळीवाड्यातील 92 व 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावता माळीनगर मधील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि संगमनेर असा पत्ता असलेल्या 81 वर्षीय वयोवृद्धासह 24 वर्षीय महिला. ग्रामीण भागातील नांदुरी दुमाला येथील 33 वर्षीय महिला, घारगाव येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 43, 36 व 16 वर्षीय तरुण, 14 वर्षीय मुलगा आणि 35 व 25 वर्षीय महिला, आश्वी येथील 42 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 37 वर्षीय तरुणासह दोन वर्षीय बालक, खांडगाव येथील 33 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,
कोल्हेवाडी येथील 26 वर्षीय तरुण, साकूर येथील 28 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 49 वर्षीय महिला, पारेगाव बु. येथील 21 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 50 वर्षीय इसम, बोटा येथील 9 वर्षीय बालक, शिबलापूर येथील 28 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 71 वर्षीय ज्येष्ठासह 18 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 70, 38 व 32 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 60 वर्षीय महिलेसह 41, 36 व 17 वर्षीय तरुण, मालदाड येथील 38 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 48 व 46 वर्षीय इसम, 42 वर्षीय तरुण आणि 36 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी, सावरगाव येथील 26 वर्षीय महिला, निमज येथील सहा वर्षीय बालक, चिखली येथील दोन वर्षीय बालक,
शेडगाव येथील 48, 40, 23 व 21 वर्षीय महिला आणि 27 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 61 वर्षीय महिला, कनोली येथील 35 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 30 वर्षीय महिला आणि खंदरमाळ येथील 29 वर्षीय तरुणासह 19 वर्षीय तरुणी असे तालुक्यातील एकूण 79 तर अन्य ठिकाणात शिर्डी येथील 33 वर्षीय तरुण, गणोरे (ता.अकोले) येथील 17 वर्षीय तरुण, पोहेगाव (ता.कोपरगाव) येथील 51 वर्षीय इसम, राहुरी येथील 39 वर्षीय तरुण व श्रीरामपूर येथील 33 वर्षीय तरुण अशा पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्यांना लॉकडाऊनबाबत तयारीत राहण्याच्या सूचना दिल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील कोविडची स्थिती आटोक्यात न आल्यास लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी सक्तिने कोविड नियमांचे पालन केल्यास व यंत्रणांनीही त्यांच्यावरील जबाबदार्या तितक्याच ताकदीने पूर्ण केल्यास ही शक्यता अशक्यतेत बदलली जावू शकते.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 257, खासगी प्रयोगशाळेचे 599 आणि रॅपीड अँटीजेनचे 372 असे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 228 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात अन्य जिल्ह्यातील 22 जणांचा समावेश आहे. आज सर्वाधीक रुग्णवाढ अहमदनगर महापालिका क्षेत्र 354, राहाता 126, कोपरगाव 89, संगमनेर 84, राहुरी 82, श्रीरामपूर 79, कर्जत 59, नेवासा 52, जामखेड 47, अकोले 39, नगर ग्रामीण 37, पारनेर 35, श्रीगोंदा 33, शेवगाव 22 व लष्करी परिसरातून 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 90 हजार 795 झाली असून आजवर 84 हजार 361 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत तर सध्या 5 हजार 242 जण सक्रीय संक्रमित आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 192 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. आज जिल्ह्यातील 857 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 1 हजार 228 रुग्णांची नव्याने भर पडली. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 92.91 टक्के इतके आहे.